sentenced-life-imprisonment-: नात्याला काळीमा फासणाऱ्या आरोपी बापास आजन्म कारावास; अकोट सत्र न्यायालयाचा निकाल
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारा आरोपी महेंद्र श्रीराम कठेरिया यास अकोट सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
दिनांक २९.०१.२०२६ रोजी अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी पो.स्टे. हिवरखेडचे अपराध क्रमांक २३५/२०१७ कलम ३७६ (२) (एफ) (एन) भादंवि., सहकलम ६ पोक्सो ॲक्ट मधील आरोपी महेंद्र श्रीराम कठेरिया (वय अंदाजे ३९ वर्ष धंदा शेती रा.लुम्बीनी रेल्वे गेट डाबकी रोड अकोला जि. अकोला) याचे विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने त्याने १२ वर्षीय स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाबद्दल आजन्म जन्मठेपेची शिक्षा व रु. २५,०००/- (रूपये पंचविस हजार फक्त) द्रव्यदंड व दंड न भरल्यास सहा महिने अधिकचा सश्रम कारावास अशा प्रकारे शिक्षा सुनावण्यात आली. तसेच दंडाची रक्क्म आरोपीने भरलयास २५ हजार पिडीताला देण्यात यावी असे आदेशात नमुद केले. आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आल्यामुळे ही शिक्षा तो जिवंत असेपर्यंत भोगावी लागेल.
सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख न्यायालयात युक्तीवाद केला की, या प्रकरणात दि. २०.११. २०१७ रोजी हिवरखेड येथे गेलेले फिर्यादीचे वडील, पती महेंद्र कठेरीया व मुलगी (पिडीता) हे रात्री हिवरखेडला मुक्कामी असताना आरोपीने पिडीताला पाय दाबायला लावण्याच्या बहाण्याने जवळ बोलावून जबरीने वाईट काम केले, असे पिडीताने फिर्यादीला सांगितले. त्यानंतर दि.२१.११.२०१७ रोजी फिर्यादीने आरोपीला पिडीताने सांगितलेल्या माहितीप्रमाणे विचारणा केली असता, आरोपी दारु पिलेला असल्याने फिर्यादी सोबत भांडण केले. त्यानंतर पिडीताची आई फिर्यादीने पोलीस स्टेशन हिवरखेडला येवून फिर्याद दिली.
या प्रकरणात आरोपीविरुध्द कलम ३७६ (२) (आय) (एफ) (एन) भादंवि., ५०६ सहकलम ५ (एल) (एन), ६ पोक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद दाखल झाला व तपासअधिकारी पोलीस उप निरिक्षक एस.एम.भस्मे यांनी आरोपी विरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी एकुण १३ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयात नोंदविल्या त्यामधे प्रामुख्याने पिडीतेची आई, पिडिता, वैदयकीय अधिकारी, मुख्याध्यापक व तपासअधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.
सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी शिक्षेसंबधी युक्त्तीवाद करतांना न्यायालयात युक्तीवाद केला की, आरोपीने केलेला गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असून मनाला किळस आणणारा आहे. आरोपीने वडील व मुलगी या नात्याला काळीम फासली आहे. अशा आरोपीला दया दाखविल्यास समाजामध्ये चुकीचा संदेश जावु शकते. विकृत मनोवृत्तीच्या आरोपीने स्वतःच्या मुलीवर अत्याचार केला असल्याने आरोपीला कुठल्याही प्रकारची दयामाया न दाखविता जास्तीत-जास्त कठोर शिक्षा देण्यात यावी.
या प्रकरणात हिवरखेड पोलीस स्टेशनचे पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस हवालदार ज्योती तेलगोटे व ए.पी.पी. पी.बी. सहारे यांनी सहकार्य केले.
दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील अकोट यांनी आरोपी महेंद्र श्रीराम कटेरीया याला आजन्म जन्मठेपेची शिक्षा दंडासह ठोठावली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा