owaisis-public-meeting-in-akl: अकोल्यात ओवेसींची जाहीर सभा; गर्दी अनियंत्रित, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमच्या ३२ उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी अकोल्यात दाखल झाले होते. त्यांच्या जाहीर सभेतून ओवेसी यांनी स्थानिक काँग्रेस आमदारांपासून ते थेट केंद्रीय मंत्र्यांपर्यंत जोरदार टीका केली.
आपल्या प्रभावी आणि आक्रमक भाषणशैलीसाठी ओळखले जाणारे ओवेसी यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी सभास्थळी गर्दी केली होती. भाषणादरम्यान ओवेसी यांनी पोलिसांना कार्यकर्ते व नागरिकांना मंचाजवळ येऊ देण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अनेक नागरिकांनी पोलिसांचा सुरक्षा कवच भेदत थेट डी विभागात, मंचाजवळ प्रवेश केला.
सभा संपल्यानंतर ओवेसी यांना जवळून पाहण्यासाठी व भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी मंचाजवळ मोठी गर्दी केली. काही कार्यकर्त्यांनी थेट मंचावर चढण्याचाही प्रयत्न केला. याच दरम्यान ओवेसी आपल्या वाहनातून निघत असताना गर्दी अधिकच वाढली व परिस्थिती तणावपूर्ण झाली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. लाठीचार्जनंतर काही काळ पोलीस व नागरिकांमध्ये शाब्दिक वाद झाला. मात्र उपस्थित वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि वाद निवळला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा