municipal-election-2026-akl: अकोला मनपा निकालानंतर सत्ता संघर्षाला वेग ; भाजप विरोधात एकत्र येण्याचा डाव!
८० जागांच्या मनपात कोणालाही स्पष्ट बहुमत नाही; भाजप ३८ जागांसह मोठा पक्ष, मात्र सत्ता स्थापनेसाठी गणित जुळवावे लागणार
ठळक मुद्दे (News Highlights)
▪️ अकोला महानगरपालिकेत ८० जागांसाठी निवडणूक
▪️ भाजप सर्वात मोठा पक्ष; मात्र स्पष्ट बहुमतापासून दूर
▪️ काँग्रेसची दमदार कामगिरी; २१ जागांवर विजय
▪️ भाजपविरोधी सर्व पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन
▪️ करवाढ कमी करणे व मूलभूत सुविधा देण्याचे आश्वासन
नीलिमा शिंगणे जगड
अकोला महानगरपालिकेच्या ८० जागांसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भारतीय जनता पक्ष ३८ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना इतर पक्षांच्या पाठिंब्याची आवश्यकता भासणार आहे.
या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार कामगिरी करत तब्बल २१ जागांवर विजय मिळवला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ६ जागा मिळाल्या असून, वंचित बहुजन आघाडीला स्वबळावर लढून ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
महायुतीतील घटक पक्षांपैकी शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना प्रत्येकी १ जागा मिळाली आहे. तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ३, एमआयएमला ३, अकोला विकास समितीला १ जागा मिळाली असून १ जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
स्पष्ट बहुमत नसल्यामुळे अकोल्याच्या राजकारणात सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी भाजपविरोधी सर्व पक्षांनी एकत्र येऊन महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्याचे आवाहन केले आहे.
मतमोजणीनंतर प्रतिक्रिया देताना आमदार पठाण म्हणाले की, मतदारांनी भाजपला स्पष्ट कौल दिलेला नाही. मागील काही वर्षांतील भाजपच्या सत्ताधारी कारभाराला शहरातील नागरिक कंटाळले असून, त्याचा थेट परिणाम या निवडणूक निकालावर दिसून आला आहे.
निवडणुकीपूर्वी भाजपकडून ‘६० पार’ च्या घोषणा केल्या जात होत्या. मात्र प्रत्यक्षात भाजपला केवळ ३८ जागांवरच समाधान मानावे लागले. अनेक प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार अत्यल्प मताधिक्याने विजयी झाले असून, हे मतदारांमधील नाराजीचे स्पष्ट द्योतक असल्याचे आमदार पठाण यांनी सांगितले.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी तसेच अन्य समविचारी पक्षांनी एकत्र येऊन चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले. स्थिर, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार देण्यासाठी काँग्रेस पक्ष मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घेण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपविरोधी एकत्रित सत्ता स्थापन झाल्यास, मागील काळात झालेली अवाजवी करवाढ कमी केली जाईल. तसेच निःशुल्क कचरा घंटागाडी, स्वच्छता व्यवस्था आणि सुरळीत पाणीपुरवठा अकोल्याच्या नागरिकांना दिला जाईल, असा विश्वास आमदार साजिद पठाण यांनी व्यक्त केला आहे.
अकोला महानगरपालिकेतील विजयी उमेदवारांची पूर्ण यादी खालीलप्रमाणे:
प्रभाग १
शेख अब्दुल्लाह शेख सलीम (काँग्रेस)
अजगर नसीरिन मकसूद खान (काँग्रेस)
निलोफर खान सोहेल खान (काँग्रेस)
अब्दुल सत्तार खान अब्दुल करिम खान (काँग्रेस)
प्रभाग २
सीमा अंजुम (एमआयएम)
शरद तुरकर (भारतीय जनता पार्टी)
मैमूना बी एमआयएम
सय्यद रहीम सय्यद हाशम
प्रभाग ३
शशिकला सतीश काळे (भाजपा)
नीतू महादेव ऊर्फ बबलु जगताप (भाजपा)
प्रशांत गोविंदराव जोशी (भाजपा)
देव निलेश रामकृष्ण (वंचित बहुजन आघाडी)
प्रभाग ४
संदिप रामकृष्ण शेगोकार (भाजपा)
शिल्पा किशोर वरोकार (भाजपा)
वरोकार सुरेखा राजेश – शिवसेना (उबाठा)
अभय अशोक खुमकर – शिवसेना (उबाठा)
प्रभाग ५
खंडारे विद्या सुभाष (भाजपा)
जयंत रामराव मसने (भाजपा)
अवचार रश्मि प्रशांत (भाजपा)
अग्रवाल विजय कमलकिशोर (भाजपा)
प्रभाग ६
आरती प्रकाश घोगलिया (भाजपा)
हर्षद प्रमोद भांबेरे (भाजपा)
निखिता राहुल देशमुख (भाजपा)
पवन मुगुटराव महल्ले (भाजपा)
प्रभाग ७
सुवर्णरेखा विजय जाधव (काँग्रेस)
चांद चौधरी (भाजप समर्थित अपक्ष)
किरण मेश्राम (भाजप समर्थित अपक्ष)
शेख फरीद शेख करीम (काँग्रेस
प्रभाग ८
सरोदे सोनाली दिनेश – शिवसेना (उबाठा)
मनोज पाटील – शिवसेना (उबाठा)
क्षीरसागर माधुरी सुनिल (भाजपा)
धोटे राजेश्वर केशव (भाजपा)
प्रभाग ९
शिरसाट प्रिया अश्विन (काँग्रेस)
निखत शाहीन अफसर अहमद कुरेशी (काँग्रेस)
कनीजा खातुन मोहम्मद इलियास (काँग्रेस)
मोहम्मद फजलु अब्दुल करीम (काँग्रेस)
प्रभाग १०
शेळके मंजुषा संजय (भाजपा)
वैशाली विलास शेळके (भाजपा)
गरड अनिल देविदास (भाजपा)
नितीन मुरलीधर ताकवाले (भाजपा)
प्रभाग ११
जैनब बी शेख इब्राहिम (काँग्रेस)
शाहीन अंजुम मेहबुब खान (काँग्रेस)
फिरदौस परवीन अरीफ खान (काँग्रेस)
डॉ. जिशान हुसेन (काँग्रेस)
प्रभाग १२
संतोष देवराव डोंगरे (भाजपा)
कल्पना संजय गोटफोडे (भाजपा)
उषारानी जगजितसिंग विर्क (शिवसेना)
सागर सुभाषचंद्र भारुका – शिवसेना (उबाठा)
प्रभाग १३
इंगळे विशाल श्रावण (भाजपा)
काकड प्राची निलेश (भाजपा)
अग्रवाल सुनिता विजय (भाजपा)
आशिष पवित्रकार (अपक्ष)
प्रभाग १४
उज्वला प्रविण पातोडे (वंचित)
जयश्री महेंद्र बहादूरकर (वंचित)
पराग रामकृष्ण गवई (वंचित)
शेखशमशु कमर शेख साबीर (वंचित)
प्रभाग १५
आलीम चंदानीहरीश रतनलाल (भाजपा)
भंसाली मनीषा रवींद्र (भाजपा)
शारदा रणजित खेडकर (भाजपा)
बाळ टाले (भाजपा)
प्रभाग १६
सिध्दार्थ रामदास उपरवट (भाजपा)
अमरीन सदफ सैय्यद नाजीम – राष्ट्रवादी (शरद पवार)
नर्गिस परवीन फय्याज खान – राष्ट्रवादी
रफिक सिद्दिकी – राष्ट्रवादी (शरद पवार)
प्रभाग १७
गेडाम जया विनोद (काँग्रेस)
मोहोकार अमोल अवधुत (भाजपा)
रफिया बि याकुब खान (काँग्रेस)
आझाद खान अलियार खान (काँग्रेस)
प्रभाग १८
कांबळे स्मिता गजानन (काँग्रेस)
अमोल सुधाकर गोगे (भाजपा)
अर्शिया परवीन मोहम्मद शारिक (काँग्रेस)
फिरोज खान अलीयार खान (काँग्रेस)
प्रभाग १९
धबाले धनंजय गणपत (भाजपा)
गजानन शालीग्राम सोनोने (भाजपा)
योगिता गणेश पावसाळे (भाजपा)
गावंडे पुजा पंकज -राष्ट्रवादी (शरद पवार)
प्रभाग २०
विजय रामदास इंगळे शिवसेना (उबाठा)
सुरेखा मंगेश काळे शिवसेना (उबाठा)
सोनाली गणेश अंधारे (भाजपा)
विनोद मुरलीधर मापारी (भाजपा)
अकोला पालिकेत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असला तरी महापौरपदासाठी बहुमताचा आकडा स्वबळावर गाठता आला नाही. भाजपाला या पालिकेत सत्तेसाठी मित्रपक्षांसोबत जुळवून घ्यावे लागणार आहे. अकोल्यात काँग्रेसची ताकद वाढली आहे असे या निकलावरुन स्पष्ट होत आहे. काँग्रेसच्या वाढलेल्या आठ जागा हे पक्षाची कामगिरी गतवेळीपेक्षा सुधारल्याचे द्योतक आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा