- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-crime-news-shivsena: राहूल कराळे यांच्या गाडीवर हल्ला करणारे चारही हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात; आरोपींनी दिली गुन्ह्याची कबूली
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख राहूल कराळे यांच्या गाडीवर हल्ला करणारे चार हल्लेखोर सिव्हिल पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाल्याचे समोर येत आहे.
गुन्हयाची थोडक्यात हकिकत
हकिकत अशा प्रकारे आहे की, पो.स्टे. सिव्हिल लाईन, अकोला येथे फिर्यादी राहुल सुरेश कराळे (वय ३२ वर्षे व्यवसाय शेती रा. लोखंडे लेआउट मोठी उमरी अकोला) यांनी जबानी रिपोर्ट दिला की, यातील नमुद फिर्यादी हे शिवसेना (उबाठा) या पक्षाचे शहर प्रमुख आहेत. ०१ मार्च २६ रोजी सकाळी ११ वाजताचे दरम्यान कामानिमीत्त फिर्यादी आगर येथे गेले होते. रात्री ०९.४० वाजताचे दरम्यान मोठी उमरी येथील घरी परत आले असता, घराजवळ त्यांची बोलेरो चार चाकी गाडी (क्रमांक एम एच ३० बिबि २७००) उभी करीत असतांना गाडीजवळ मोटार सायकलवर तिन अज्ञात ईसम आले व ईतर तिन ईसम गाडी येण्या पूर्वीच त्या ठिकाणी रेकी करीत होते. गाडीजवळ आलेल्या तिन ईसमापैकी एकाने त्याचे जवळील घण (हाथोडा) गाडीच्या समोरील बाजुने ड्रायव्हर साईडने काचावर मारला. त्यामुळे गाडीचे नुकसान झाले तसेच ईतर दोघांनी त्यांचे जवळील तलवारीने गाडीवर हमला केला. तसेच एका ईसमास त्यापैकी दुस-या ईसमाने म्हटले की, “निकाल बंदुक उडा डाल”, असे वारंवार म्हणत होता. तेंव्हा फिर्यादी राहुल कराळे जिव वाचविण्याकरीता गाडीचे मधातील सिटचे मागे लपले होतो. त्यावेळी मोहल्यातील लोक आरडा ओरड करून जमा झाल्याने हल्लेखोर तेथुन पळुन गेले.
राहूल कराळे यांचे मित्र अभिजीत गोंडचवर व विशाल घरडे हे यावेळी रस्त्यात उभे होते. त्यांनी सांगीतले की, हल्लेखोर पळुन जात असतांना एकमेकांना म्हणत होते की, “आज राहुल बच गया उसको सात आठ दिनमे गोली मारके टपकाडालेंगे, आज बहुत लोग जमा हो गये करके राहुल बच गया”, असे म्हणत होते.फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून अज्ञात हल्लेखोरांवर ३७८/२०२६ कलम १०९ (१), ३२४(४), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेण्यात आला.
गुन्हयाचे तपासात घटनास्थळा जवळील सिसिटिव्ही फूटेज तसेच गोपनीय माहिती वरून गुन्हयात अनोळखी आरोपी यांचा तत्परतेने दोन तासात शोध घेवून आरोपी हर्षल दिलीप मंडलीक (वय ३२ वर्षे, रा. जगदंबा माता मंदिरा जवळ, लहान उमरी अकोला), चेतन विजय खंडारे (वय ३७ वर्षे, रा. शिवार्पन कॉलनी, राष्ट्रीय शाळेजवळ, मोठी उमरी अकोला), सागर संतोष इंगळे (वय २५ वर्षे, रा. खरप बु. ता. जि. अकोला), वैभव दिनेश गोपनारायण (वय २७ वर्षे, रा. शक्तीपिठ मंदिराजवळ, न्यु. तापडीया नगर, अकोला) यांना रात्री दोन वाजताच्या दरम्यान ताब्यात घेवून त्यांना विचारपूस केली असता, त्यांनी जुन्या वैमनस्या वरून गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर गुन्हयात कोणत्या प्रकारचे अग्नीशस्त्र किंवा तलवारीचा उपयोग न केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. वेगवेगळया ठिकाणच्या सिसिटिव्ही फूटेजची पाहणी केली असता त्यामध्ये सुध्दा आरोपी अग्नीशस्त्र किंवा तलवारी सह दिसून येत नाहीत. तरी गुन्हयाचे तपासात पुढिल कार्यवाही करण्याची तजबीज ठेवण्यात आली आहे. आरोपीतांना सदर गुन्हयात अटक कार्यवाही करण्यात आली असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
कार्यवाही करणारे अधिकारी आणि अमंलदार
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधिक्षक रेडडी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, शहर विभाग अकोला यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक मालती कायटे (पो स्टे सिव्हील लाईन अकोला) यांचे आदेशानुसार पो.स्टे. सिव्हील लाईन अकोला येथील अधिकारी व कर्मचारी पोलीस उपनिरिक्षक दिनेश पवार यांच्यासह आशिष खंडारे, शक्ती कांबळे प्रदिप पवार, एकनाथ त्रिकाळ, पवन सिरसाट, अक्षय तायडे, नितेश नाचने यांनी कारवाई केली.
बोलेरो कार
Accused
beloro car
confess
crime
crime news
police custody
political party
Rahul Karale
shiv sena
UBT
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा