hidayat-patel-murder-case-akl: काँग्रेस नेते हिदायत पटेल हत्याकांड: संशयीत आरोपीचा अटकपूर्व जमानत अर्ज न्यायालयात दाखल, एक आरोपी अटकेत



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: काँग्रेस नेते हिदायत पटेल खून प्रकरणात संशयीत आरोपी मोहम्मद बद्रूजमा याने अटकपूर्व जमानत अर्ज अकोट न्यायालयात दाखल केला असून, या अर्जावर १६ जानेवारी रोजी युक्तिवाद होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.



अकोट दिनांक १४.०१.२०२६ रोजी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ल बी.एम. पाटील यांचे न्यायालयात अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे फाईल वरील अप. क्र. ०५/२०२६, कलम १०३(१),१०९.३ (५) भान्यासं मधील संशयीत आरोपी मोहम्मद बहुजम्मा मो.आदील (वय-५३ वर्ष राहणार धारोळी बेस अकोट ता. अकोट जि. अकोला) याने अकोट तालुक्यातील मोहाळा येथील काँग्रेसचे नेते हिदायतउल्ला पटेल यांचे खुन प्रकरणात अटकपुर्व जमानत अर्ज दाखल केला आहे.  


आज १४.०१.२०२६ रोजी  अकोट सत्र न्यायालयात या प्रकरणातील तपास अधिकारी निखील पाटील (आय.पी.एस.) सहायक पोलीस अधिक्षक उपविभाग अकोट यांनी सरकारी वकील अजित देशमुख यांचे मार्फत जमानत अर्जाला लेखी उत्तर दाखल करण्यात आले असून आरोपी तर्फे आज वकील ॲड. सत्यनारायण जोशी यांनी काही कागदपत्र दाखल करण्याकरीता वेळ मागितला व सरकार पक्षाला सहाय करण्याकरीता ॲड. श्रीरंग तट्टे यांनी सुध्दा अर्ज दाखल केल्यामुळे वरील प्रकरणात जमानत अर्जावर युक्तीवाद करीता १६ जानेवारी २०२६ सुनावणी करीता तारीख ठेवण्यात आली आहे. 


दरम्यान, या प्रकरणात सरकारी वकील अजित देशमुख यांचे सोबत युक्तीवादाकरीता जिल्हा सरकारी वकील अकोला आर. आर. उर्फ गिरीश देशपांडे अकोट न्यायालयात येणार असल्याचे समजते. 


या प्रकरणात संशयीत आरोपी म्हणुन मोहम्मद बद्रुजम्मा मो. आदील यांचे नाव एफ.आय. आर. मधे आहे व संशयीत आरोपी म्हणुन इतर चार लोकांचे नावेसुध्दा एफ.आय.आर. मधे आहेत व गुन्हा दाखल झाल्यापासुन सर्व संशयित आरोपी फरार असल्याचे समजते. 



तसेच या प्रकरणात मोहाळा येथील उबेद पटेल राजीक उर्फ कालु पटेल या आरोपीला अटक करण्यात आली असून हा आरोपी पोलीस कस्टडी रिमांड मधे आहे. व या प्रकरणाचा तपास सुरु आहे. 



या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे विशेषतः राजकीय क्षेत्र तसेच अकोला जिल्हयातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या