amc-election-bjp-political-news : अकोला महाविकास संकल्पनामा : जनतेच्या अपेक्षांचा आरसा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ४ जानेवारीला प्रकाशन




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोला महानगरातील सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा, सूचना आणि मतांचा सखोल अभ्यास करून भारतीय जनता पक्षाने ‘महाविकास संकल्पनामा’ तयार केला असून, हा संकल्पनामा राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार, दि. ४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता, क्रिकेट क्लब येथे जाहीर सभेत जनतेला समर्पित करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा निवडणूक प्रमुख विजय अग्रवाल यांनी दिली.


अकोला शहरात २२५ ठिकाणी मतपेट्या ठेवून नागरिकांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. यासोबतच विविध माध्यमांचा वापर करत समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधून, शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. या प्रक्रियेतूनच जनतेच्या मनातील अपेक्षांचे प्रतिबिंब असलेला हा विकास संकल्पनामा आकाराला आला आहे.


हा संकल्पनामा गिरीश जोशी यांच्या नेतृत्वाखालील ११ सदस्यीय समितीने तयार केला आहे. या समितीत डॉ. अभय जैन, डॉ. किशोर मालोकार, सिद्धार्थ शर्मा, विनोद मनवाणी, अ‍ॅड. सुभाष सिंग ठाकूर, किशोर पाटील, डॉ. अमित कावरे, वसंत बाछूका यांचा समावेश होता. समितीने शहरातील विविध घटकांशी थेट संवाद साधत नागरिकांच्या गरजा, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या.


या जाहीर सभेस भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, जयंत मसने, विजय अग्रवाल, किशोर पाटील, संतोष शिवरकर, वैशाली शेळके, कृष्णा शर्मा आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.


अकोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाने जनतेच्या सहभागातून तयार केलेला हा महाविकास संकल्पनामा आगामी काळात दिशादर्शक ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.


टिप्पण्या