akola-bar-association-election: अकोला बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. अजय वाघमारे; सह सचिवपदी प्रमोद कोरडे, शितल गवई, विजय भांबेरे उपाध्यक्षपदी



भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला बार असोसिएशनची सार्वत्रिक निवडणूक 2026-27 आज शुक्रवारी अकोला न्यायालय परिसरात पार पडली. अध्यक्षपदासाठी ॲड अजय वाघमारे आणि ॲड हेमसिंग मोहता यांच्यात सरळ लढत होती. यामध्ये वाघमारे यांनी 682 तर मोहता यांनी 633 मत मिळविली. यात 49 मतांची आघाडी घेत वाघमारे यांनी अध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात घातली. अजय वाघमारे यांनी याआधी देखील अकोला बार असोसिएशनचे अध्यक्षपद भूषविले आहे.या गटात 6 मते अवैध ठरली.

या लढतीमध्ये ॲड संजय देशमुखांचे नामांकन होते. मात्र बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी दिलेल्या निर्देशनुसार त्यांनी AIBE परीक्षा उत्तीर्ण केलेली नसल्याने त्यांचे नामांकन निवडणूक आधीच मागे घेण्यात आले. मात्र वोटर लिस्ट मधे नाव छापील असल्याने त्यांना 11 मते पडली. मात्र हे मते निकाल देताना विचारात घेण्यात आलेले नाही. 


ॲड. शितल गवई विजयी

महिला उपाध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात पाच उमेदवार होत्या. यामध्ये ॲड शितल गवई यांनी सर्वाधिक 552 मते मिळवून विजय मिळविला. ॲड. संगिता गावंडे यांनी 76, ॲड.शारदा मल्होत्रा यांनी 378,ॲड. निर्मला नागदेवे यांनी 152 तर ॲड.मंजू सावरकर यांनी 163 मते मिळविली. तर या गटात 11 मते अवैध ठरली.


विजय भांबेरे यांचा विजय

पुरुष गटातील उपाध्यक्ष पदाकरीता तीन उमेदवार रिंगणात होते. ॲड. विजय भांबेरे यांनी तब्बल 300 मतांची आघाडी घेत विजयश्री खेचून आणली. ॲड. भांबेरे यांनी 675 मते मिळविली. ॲड.सुमेध डोंगरदिवे यांनी 264 तर ॲड.राहुल वानखडे यांनी 375 मते मिळविली.


प्रमोद कोरडे यांना सर्वाधिक 700 मते

या निवडणुकीत सर्वाधिक 700 मते ॲड. प्रमोद कोरडे यांनी मिळवून सहसचिवपद प्राप्त केले. ॲड. आकाश भगत यांनी 497 तर ॲड पवनेश अग्रवाल यांनी 121 मते मिळविली. या गटात 14 मते अवैध ठरली. 203 मतांची आघाडी घेत ॲड. कोरडे विजयी झाले. 


या निवडणुकीत एकूण 1332 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी ॲड उदय नाईक यांनी निकालाची घोषणा केली.


निकालाची घोषणा



सर्व विजयी उमेदवारांचे भारतीय अलंकार न्यूज 24 परिवार तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 

टिप्पण्या