भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : कायदा व सुव्यवस्था, शिक्षक-शिक्षण क्षेत्रातील वाढत्या समस्या तसेच राज्यात सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अकोला महानगरपालिकेत ट्रिपल इंजिन सरकार स्थापन होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्या सरकारसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने व नागरिकांनी आपला खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन राज्यमंत्री नामदार पंकज भोयर यांनी केले.
भारतीय जनता पार्टी कार्यालयात विविध समाजघटकांतील नागरिक, शिक्षक संघटना व सामाजिक-शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर होते.
यावेळी मंचावर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, संगीता शिंदे, किशोर पाटील, कृष्णा शर्मा, सुलभा दुतोंडे, हर्षद साबळे, माया धुळे, वैशाली पालीवाल, रूपाली काकड, अंबादास उमाळे, माधव मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले की, अकोला शहराचा सर्वांगीण विकास झाला असून, केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार असल्यामुळे या विकासाला अधिक गती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वस्पर्शी विकासासाठी भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले की, भौगोलिक, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक बाबींसह जनतेच्या अपेक्षा जाणून भाजप शहरासाठी संकल्पनामा तयार करीत आहे. अकोल्याच्या गतिशील विकासासाठी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी शिक्षक संघटनांसह विविध सामाजिक संघटनांनी आपल्या समस्या व अपेक्षा मांडल्या. त्यावर राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सविस्तर उत्तरे देत समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमात सिंधू पतसंस्था तसेच विविध शैक्षणिक व सामाजिक संघटनांच्या वतीने राज्यमंत्री भोयर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष गावंडे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा