akola-municipal-election-vote: अकोला मनपा निवडणूक 2026: मतदानाला शांततेत सुरुवात; मात्र काही केंद्रांवर मतदार यादीत घोळ


ठळक मुद्दा 

सकाळी 7.30 पासून मतदान सुरू | 630 केंद्रांवर 5.50 लाख मतदारांचा उत्साह



नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज गुरुवारी सकाळी ७.३० वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. शहरातील ६३० मतदान केंद्रांवर तब्बल ५ लाख ५० हजार ६० मतदार आपला लोकशाही हक्क बजावत आहेत. ही निवडणूक ८० जागांसाठी होत असून एकूण ४६९ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक प्रभागात मतदारांना चार उमेदवारांना मतदान करावे लागत आहे.



मतदारांची आकडेवारी (अंतिम यादी)


पुरुष मतदार: 2,74,877

महिला मतदार: 2,75,142

इतर मतदार: 41

एकूण मतदार: 5,50,060

एकूण प्रभाग: 20



पक्षनिहाय उमेदवारांची संख्या


शिवसेना (शिंदे): 64

भाजप: 62

शिवसेना (ठाकरे): 54

वंचित बहुजन आघाडी: 52

काँग्रेस: 46

एमआयएम: 31

राष्ट्रवादी (शरद पवार): 23

राष्ट्रवादी (अजित पवार): 14

मनसे: 09

आप: 06

बसपा: 05

मविस: 05

प्रहार जनशक्ती: 03

वेपाइं: 03

समाजवादी पक्ष: 01

पीपाइंडे: 01

रासप: 01

अपक्ष: 87


सकाळी काही केंद्रांवर गोंधळ


प्रशासनाची तयारी पूर्ण असली तरी सकाळी काही मतदान केंद्रांवर EVM उशिरा सुरू झाल्या.

तसेच,

मतदार यादीत नाव न सापडणे

मतदार क्रमांकावर दुसऱ्याच मतदाराचे नाव

विधानसभा निवडणूक यादी व मनपा यादीतील क्रमांकात मेळ न बसणे

अशा तक्रारी अनेक ठिकाणी समोर आल्या. त्यामुळे काही वेळ मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला.


मतदान केंद्रांवरील सुविधा


महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून नागरिकांसाठी—

पिण्याचे पाणी

व्हीलचेअर

दिव्यांगांसाठी रॅम्प

मंडप

मतदार यादी शोधण्यासाठी स्वतंत्र यादी

काही ठिकाणी सेल्फी पॉइंट

तसेच पिंक बूथ

अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


एकंदरीत चित्र


शहरात शांततेत मतदान सुरू असले तरी मतदार यादीतील त्रुटींमुळे काही ठिकाणी गोंधळ पाहायला मिळतो आहे. दुपारपर्यंत हा गोंधळ दूर करून मतदान प्रक्रिया सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



स्रोत: भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड




टिप्पण्या