akola-municipal-corporation-: भाजप नेतृत्वाखालील ‘शहर सुधार आघाडी’कडून सत्ता! 30 जानेवारीला महापौर-उपमहापौर निवडणूक

महापौर पदासाठी ओबीसी महिला उमेदवारांमध्ये चुरस; अकोला महापालिकेचा महापौर ओबीसी महिला 



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: राज्यातील 29 महानगर पालिकांच्या महापौर पदासाठी गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानुसार अकोला महानगरपालिकेचे महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. आरक्षण जाहीर होताच आता महापौर व उपमहापौर निवडीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून, 30 जानेवारी 2026 रोजी विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत महापौर आणि उपमहापौरांची निवड केली जाणार आहे. इच्छूक नगरसेवकांना 25 व 26 जानेवारी रोजी महापालिका सचिवांकडे उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.


दरम्यान, अकोला महापालिकेत भाजपच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या 44 सदस्यांच्या ‘शहर सुधार आघाडी’कडे स्पष्ट बहुमत असल्याने महापौर व उपमहापौर ही पदे याच आघाडीकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, महापौर पद ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्याने भाजपसह आघाडीतील इच्छूक महिला नगरसेवकांमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे.


ठळक मुद्दे : News Highlights 


▪️ अकोला महापालिकेचे महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव

▪️ 30 जानेवारीला महापौर व उपमहापौर निवडणूक

▪️ 25 व 26 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत

▪️ विशेष सर्वसाधारण सभेत निवड प्रक्रिया

▪️ भाजप नेतृत्वाखालील ‘शहर सुधार आघाडी’कडे 44 सदस्यांचे बहुमत

▪️ भाजपचे 38 नगरसेवक; राष्ट्रवादी, शिंदे गट व स्थानिक आघाडीचा समावेश

▪️ महापौर पदासाठी ओबीसी महिला उमेदवारांमध्ये तीव्र स्पर्धा




टिप्पण्या