amc-general-body-meeting-ak: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा; पत्रकारांना सभेत प्रवेश नाकारला!
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून संबंधित ठरावांना मंजुरी देण्यात आली. तसेच स्वीकृत सदस्यांची घोषणा करण्यात आली. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रतिनिधी नियुक्तीचा विषय, कमिशन खोरी वक्तव्य, तसेच पत्रकारांच्या प्रवेशावरून सोमवारी सभागृहात गदारोळ झाला.
महानगरपालिकेच्या सभेत राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळाले. एका विषयाच्या चर्चेत नगरसेवक आझाद खान यांनी सत्ताधाऱ्यांना कमिशन द्यावे लागते, असे वक्तव्य केल्याने सभेत गदारोळ झाला. तसेच पत्रकारांना सभेत प्रवेश नाकारल्याचा मुद्दा नगरसेवक पराग गवई यांनी उचलून धरला.
शहरातील मोर नाल्यांची जेसीबी मशीनद्वारे, तर नाल्यांची सफाई मनुष्यबळा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कचरा त्याच दिवशी उचलण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची राहील अन्यथा कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले, तसेच या कामास निविदा काढण्याचे आणि नगरसेवकांना एसएमएसद्वारे माहिती देण्याचे निर्देशही सभेत देण्यात आले. यासोबतच मोकाट गुरे ढोरे, भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त झाले त्यांचा बंदोबस्त करण्याची सदस्यांकडून मागणी करण्यात आली.
सभेत शहरातील मोठ्या नाल्यांच्या सफाईवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला. याशिवाय प्रभागनिहाय कचरा वाहतुकीसाठी टायरसह लोडगाड्या खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. शहरातील मोकाट जनावरे, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या विषयावर सभेत चर्चा झाली आणि त्यासंदर्भातील ठरावांना मंजुरी देण्यात आली.
सभेला महापौर शारदा खेडकर, उपमहापौर अमोल गोगे, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, गटनेता पवन महल्ले, विरोधी पक्ष नेते डॉ. जिशान हुसेन, मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, नगरसचिव अमोल डोईफोडे, प्रशासकीय अधिकारी अनिल बिडवे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
चर्चेत प्रामुख्याने विजय अगरवाल, डॉ.जिशान हुसेन, पवन माहल्ले, आशिष पवित्रकार, पराग गवई ,उषा वीरक, निलोफर खान, मंजूषा शेळके, शेख साबीर, अब्दुल सलाम खान, मो. फजलू पहिलवान, विनोद मापारी, ॲड देवाशिष काकड, हरीश आलिमचंदानी, शरद तूरकर ,आझाद खान, निलेश देव मनोज पाटील, वैशाली शेळके आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा