akola-city-crime-murder-case: अकोला शहरात सलग दुसऱ्या दिवशी हत्याकांड; नववर्षाच्या सुरुवातीलाच शहर हादरले, प्रेमसंबंधातील वादातून पार्टनरची निर्घृण हत्या



१ जानेवारीला तंबाखूच्या वादातून तर २ जानेवारीला प्रेमातील संशयातून रक्तरंजित घटना





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला शहरात सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या हत्याकांडनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नववर्षाच्या अवघ्या दोन दिवसांत दोन निर्घृण हत्या झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


२ जानेवारी २०२६ रोजी प्रेमातील संशयातून हत्या


अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातील संजय नगर भागात आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. तीन वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या पुरुषांच्या जोडप्यातील वादाचा शेवट थेट हत्येत झाला. मृत तरुणाचे नाव अमोल दिगांबर पवार (वय ३५) तर आरोपीचे नाव नितेश अरुण जंजाळ (वय ३८) असल्याचे समजते.


मिळालेल्या माहितीनुसार, अमोल आणि नितेश हे गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत होते. मात्र अमोल दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. काल रात्रीही दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. त्यावेळी नितेशने लाठीने अमोलच्या डोक्यावर व तोंडावर जबर मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत अमोलचा जागीच मृत्यू झाला.

आज सकाळी नितेश घरातून बाहेर पळत जोरजोरात ओरडत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. अमोल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसताच नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.




पोलिसांची जलद कारवाई


डायल ११२ वर कॉल मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात आरोपी नितेश जंजाळ याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.


मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.



१ जानेवारी २०२६ – तंबाखूच्या वादातून रक्तरंजित हत्या


नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरू असतानाच १ जानेवारीच्या मध्यरात्री अकोला शहर हादरवणारी घटना घडली होती.


मृतक : संतोष घावडे (वय ४१)

आरोपी : राम गिराम (वय २८)

ठिकाण : कृषी नगर परिसर, सिव्हिल लाईन पोलीस ठाणे हद्द


तंबाखू मागण्यावरून झालेल्या किरकोळ शाब्दिक वादाचे रूपांतर काही क्षणात हिंसक हाणामारीत झाले. रागाच्या भरात आरोपी राम गिराम याने लोखंडी रॉडने संतोष घावडे यांच्या डोक्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.


या घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.



सलग दोन हत्यांमुळे नागरिकांमध्ये भीती

सलग दोन दिवसांत झालेल्या दोन हत्याकांडांमुळे अकोला शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला असून नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.


ठळक मुद्दे (News Highlights)


अकोला शहरात सलग दुसऱ्या दिवशी हत्याकांड


२ जानेवारीला प्रेमसंबंधातील संशयातून समलिंगी पार्टनरची हत्या


१ जानेवारीला तंबाखूच्या वादातून लोखंडी रॉडने निर्घृण खून


दोन्ही घटनेतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात


नववर्षाच्या सुरुवातीलाच शहरातील कायदा-सुव्यवस्था ऐरणीवर


टिप्पण्या