vidarbha-industry-trade-expo-: विदर्भ चेंबरची ‘विटेक्स 2026’ प्रदर्शनी 2 जानेवारी पासून अकोला शहरात; 180 पेक्षा जास्त स्टॉल्स, प्रवेश निःशुल्क




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्स एन्ड इंडस्ट्री, अकोला द्वारा आयोजित व मुख्य प्रायोजक मार्वल ट्रिनीटी रियल एस्टेट एलएलपी व सह प्रायोजक विठ्ठल ऑईल असणारी विटेक्स प्रदर्शनी 2026 चे भव्य आयोजन 2, 3, 4 व 5 जानेवारी 2026 रोजी गोरक्षण रोड येथील गोरक्षण संस्थान ग्राउंडवर होत आहे. या विशाल प्रदर्शनीत 180 पेक्षा जास्त स्टॉल्स राहणार असून या माध्यमातून परिसरातील लहान मोठे उद्योग, व्यापारी, सेवा प्रदाता व स्टार्ट अप्स द्वारे आपले सर्वश्रेष्ठ उत्पादने व सेवांचे प्रदर्शन व विक्री करणार असून सर्व अकोलकर नागरिकांसाठी सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत प्रवेश मोफत असणारी ही प्रदर्शनी व्यापारी, उद्योजक व नागरिकासाठी मोठी पर्वणी ठरणार असल्याची माहिती विदर्भ चेंबरचे अध्यक्ष निकेश गुप्ता यांनी दिली.


सोमवारी चेंबरच्या कार्यालयात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत या व्यापार उद्योग प्रदर्शनीची माहिती देण्यात आली. यावेळी मंचावर चेंबरचे सचिव निरव वोरा, वरीष्ठ उपाध्यक्ष सिद्धार्थ रुहाटीया, कनिष्ठ उपाध्यक्ष निखिल अग्रवाल, कोषाध्यक्ष किशोर बाछुका, सहसचिव किरीट मंत्री, सहसंयोजक राहुल मित्तल आदी उपस्थित होते. 



विटेक्स 2026 चा मुख्य उद्देश्य


विटेक्स 2026 चा मुख्य उद्देश्य पश्चिम विदर्भात व्यापार, उद्योग व उद्यमिताला गति मिळावी, स्वदेशी, मेक इन इंडिया व वोकल फॉर लोकलच्या ग्लोबल भावनेला पुढे नेणे, रोजगाराचे नवे दालन उघडणे तथा अकोला जिल्ह्यास एक वाढते प्रमुख व्यापारिक हबच्या रुपात स्थापित करने आहे. हे आयोजन क्षेत्रीय एमएसएमई, स्टार्ट अप्स, एग्रो-प्रोसेसिंग यूनिट्स व स्थानीय उत्पादनास व्यापक बाजार प्रदान करण्यासाठी एक प्रभावी माध्यम निर्माण करणे होय. 


मोफत प्रवेश मोफत वाहनतळ सुविधा 


या प्रदर्शनीत 180 पेक्षा अधिक आकर्षक स्टॉल्स राहणार असून पश्चिम विदर्भातील उद्योग व्यापाराची आतापर्यंतचे सर्वात मोठे आयोजन हे राहणार असून यात एकाच छतात सर्व प्रकारचे उत्पादन व सेवा राहणार आहेत. सर्व कुटुंबातील सदस्यांना याचा लाभ घेता येईल असे हे आयोजन असून यात विभिन्न स्वादाने भरपूर विशेष फूड ज़ोन राहणार असून मोफत प्रवेश व वाहनतळ सुविधा (व्हेइकल पार्किंग) देखील निःशुल्क राहणार आहे.


काय पाहायला मिळणार प्रदर्शनात


या प्रदर्शनीत सोलर पैनल्स व फिटिंग्स, फर्नीचर, गृहपयोगी साहित्य, होम डेकोर , इंटीरियर डिज़ाइनिंग, गिफ्ट आर्टिकल , डिजाइनर कपड़े, ऑटोमोबाइल्स, स्पोर्ट्स व फिटनेस, रोबोटिक्स, वेलनेस सेक्टर, वॉटर ट्रीटमेंट सॉल्यूशन, एग्रो प्रोसेसिंग यूनिट्ससाठी मशीनरी व साहित्य, डेयरी प्रोडक्ट्स, प्री-फैब्रिकेटेड स्ट्रक्चर, बैंकिंग, फाइनेंस सेवा, करियर गाइडेंस, गृह निर्माण, अकाउंटिंग सॉफ्टवेयर समवेत व्यापारी व नित्य उपयोगी पडणारे सर्व उत्पादने व सेवा राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



1.50 लाख प्रेक्षकांची अपेक्षा


या व्यापार प्रदर्शनीचा उद्योजक व व्यापारी वर्गाला पण लाभ होणार असून यात त्यांना नवीन व प्रभावी बी टू बी संधी, उद्योग व उद्योजकांसाठी मजबूत नेटवर्किंग प्लेटफॉर्म, ग्राहक, उत्पादनांची प्रत्यक्ष खरेदी व लाइव डेमो, तांत्रिक, मशिनरी व आधुनिक सेवाचे सहज अवलोकन, फूड कोर्ट मध्ये विभिन्न प्रकारचे स्वादिष्ट प्रकार, संपूर्ण प्रदर्शनीत 1.50 लाख प्रेक्षकांची येण्याची अपेक्षा आहे. 



विविध समिती गठित


चार दिवसीय प्रदर्शन सफल करण्यासाठी उपसमित्या गठीत झाल्या आहेत.  


प्रदर्शनी स्थळ निर्माण समिती  

पंकज कोठारी, राजकुमार राजपाल, अनुराग अग्रवाल, नरेश अग्रवाल, अमरीश पारेख, केतन गुप्ता, रितिक अग्रवाल. 


स्थळ व्यवस्थापन समिती 

निखिल अग्रवाल, राहुल मित्तल, श्रीकांत गोयनका, आशुतोष वर्मा,ओम अग्रवाल, मनोज मोर. 


प्रदर्शनी स्थळ निर्माण समिती

इंजि.कपिल ठक्कर,सिद्धेश मुरारका भुषण अग्रवाल. 


स्टॉल नोंदणी समिती 

सलीम डोडिया, चंचल भाटी, प्रणय कोठारी, सुधीर राठी, हिमांशू खंडेलवाल, प्रतीक अग्रवाल, यश सिंघनिया. 


स्टेज व कार्यक्रम व्यवस्थापन समिती निरव वोरा, किरीट मंत्री, निलेश अग्रवाल, संतोष छाजेड, मधुर खंडेलवाल, सीए प्रशांत लोहिया, मनोज अग्रवाल, पियुष खंडेलवाल. 


ध्वनि, विद्युत व सीसीटीव्ही व्यवस्था समिती 

राहुल गोयनका, कमल खंडेलवाल, शैलेश अलीमचंदानी.


जाहिरात समिती 

मनीष केडिया, शैलेंद्र कागलीवाल, गुलशन कृपलानी, नमन खंडेलवाल, रोहित रुंगटा ,प्रतुल भारूका. 


भोजन व्यवस्थापन समिती 

सज्जन अग्रवाल, शांतीलाल भाला, आशिष अमीन, राजीव शर्मा, रोहित खंडेलवाल 


सुरक्षा व पार्किंग समिती 

दिलीप खत्री, योगेश अग्रवाल, श्रीकर सोमण, रमेश कदम, नितीन बियाणी, महेश मुंदडा, निर्मल समदाडिया.


सांस्कृतिक समिती 

रजनी महल्ले, दिपाली देशपांडे, लीना आर्या, रवीता शर्मा.  


हिशोब समिती 

किशोर बाछुका, निलेश अग्रवाल (अकाउंट्स), देवांग जैन, सीए जितेश अग्रवाल. 


अतिथी व्यवस्थापन समिती 

सिद्धार्थ रुहाटीया, कृष्णा शर्मा,आशीष चंदाराना, रुपेश राठी, हरिष लाखानी, मनोज खंडेलवाल.


विधी सल्लागार समिती 

ॲड. सुभाष ठाकूर 


स्वागत समिती 

पूर्व अध्यक्ष रमाकांत खेतान, विक्रमादित्य गोयनका, श्रीकिसन अग्रवाल, अशोक दालमिया, अशोक गुप्ता, वसंत बाछुका, निरंजन अग्रवाल, कमलेश वोरा, रमाकांत खंडेलवाल, विजय पनपालिया, राजकुमार बिलाला, नितीन खंडेलवाल.  


जनसंपर्क समिती 

बिपिन गांधी खामगाव, दीपक वाटमारे बार्शीटाकळी, दिनेश पालडीवाल शेगाव, अवीन अग्रवाल मूर्तिजापूर, नितीन भारुका मूर्तिजापूर, महेश तरडेजा अकोट, निखिल अग्रवाल अकोट, प्रमोद अग्रवाल खामगाव.  


आयोजन समिती प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत असून, व्यापारी, उद्योजक व नागरिकांनी या चार दिवसीय प्रदर्शनीचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

टिप्पण्या