sport-kabaddi-tournament-akl: केळीवेळी येथे गोपीकिसन बाजोरिया चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे भव्य उद्घाटन; दुसऱ्या दिवशी रोमहर्षक सामने

हनुमान क्रीडा संकुलासाठी ५० लाखांचा निधी - माजी आमदार तथा शिवसेना नेते गोपीकिशन बाजोरिया यांचे आश्वासन




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: केळीवेळी (ता. अकोट) येथे आयोजित गोपिकिसन बाजोरिया चषक  ५२ वी राज्यस्तरीय ज्युनिअर अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी हनुमान क्रीडा प्रसारक व बहुउद्देशीय मंडळ यांच्या वतीने मोठ्या उत्साहात सुरू झाली. स्व. तुकाराम बिडकर स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या भव्य स्पर्धेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.





भव्य उद्घाटन सोहळा – मान्यवरांची उपस्थिती


या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार तथा शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते गोपीकिशन बाजोरिया आणि कबड्डी फेडरेशनचे महासचिव जितू ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.


व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांमध्ये 

माजी आमदार नारायण गव्हाणकर, आमदार विप्लव बाजोरिया, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे, संतोष अनासने, महादेव भुईभार, सतीश भट, ठाणेदार गोपाळ ढोले, तन्मय खरोटे, रामभाऊ नवघरे, अशोक देशमुख, पप्पू चव्हाण, विवेक हिवरे, गजानन चिलात्रे, किशोर बुले, पुरुषोत्तम नळे, दिलीप आसरे, गणेश पोटे, कमलेश गावंडे, संजय चौधरी, चंद्रशेखर पाचकोर, दिनकर गावंडे, वासुदेव नेरकर, सतीश डफले, रेखा राऊत, उषाताई विरक, अतुल येडने, देविदास बोदडे, बादलसिंह ठाकूर, वासुदेव नेरकर, उमाकांत कवडे आदींचा समावेश होता.




क्षणचित्रे


मैदान पूजन व विद्यार्थ्यांचे स्वागत गीत


उद्घाटनापूर्वी आमदार गोपीकिशन बाजोरिया व महासचिव जितू ठाकूर यांच्या हस्ते मैदान पूजन करण्यात आले.


केळीवेळी जिल्हा परिषद शाळा व श्री सखाराम महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने वातावरण भारावून गेले.


विद्यार्थ्यांना यावेळी बक्षिसांची लयलूट करण्यात आली.


मैदान व परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे.


गौरव व सत्कार सोहळा


उद्घाटकांचे हनुमान क्रीडा मंडळ अध्यक्ष माधव बकाल व स्वागताध्यक्ष ज्ञानदेवराव परनाटे यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.




स्पर्धेतील उद्घाटन सामने


पुरुष विभाग: अकोला शहर विरुद्ध अकोला ग्रामीण


महिला विभाग: भंडारा जिल्हा विरुद्ध वर्धा जिल्हा



स्पर्धेचे प्रास्ताविक माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, सूत्रसंचालन धनंजय मिश्रा, तर आभार प्रदर्शन अरुण गावंडे यांनी केले.





पुढील वर्षी “सीनियर अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा” केळीवेळीत - महासचिव जितू ठाकूर


उद्घाटन प्रसंगी बोलताना जितू ठाकूर म्हणाले,


"पुढील वर्षी केळीवेळी येथे सीनियर अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा देणार आहोत. केळीवेळी सारख्या गावात एवढ्या भव्य पातळीवरील आयोजन अभिमानास्पद आहे."







हनुमान क्रीडा संकुलासाठी ५० लाखांचा निधी - आमदार गोपीकिशन बाजोरिया


उद्घाटन सोहळ्यात बोलताना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी जाहीर केले की,

"हनुमान क्रीडा संकुलासाठी ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येईल. तसेच आगामी अखिल भारतीय स्पर्धेसाठी लागणारा वेगळा निधीही उपलब्ध करून देऊ."

त्यांच्या या आश्वासनामुळे खेळाडूंमध्ये आणि आयोजकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.



दुसऱ्या दिवशी रोमहर्षक सामने 


स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मुले व मुली दोन्ही गटात चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. चंद्रपूर ग्रामीण, भंडारा, गोंदिया, वर्धा, अकोला ग्रामीण आदी संघ वरचढ ठरतं आहेत. उद्या स्पर्धेचा समारोप सायंकाळी होणार आहे. त्यामुळे गोपिकिसन बाजोरिया चषक कोण जिंकणार याकडे क्रीडा प्रेमींचे लक्ष लागले आहे.


ठळक मुद्दे


केळीवेळीत ५२ वी राज्यस्तरीय ज्युनिअर अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे भव्य उद्घाटन


हनुमान क्रीडा संकुलात पुरुष व महिला विभागातील संघांचा सहभाग


पुढील वर्षी केळीवेळी येथे सीनियर अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा होणार


आमदार बाजोरिया यांच्याकडून ५० लाख निधीची घोषणा


विद्यार्थ्यांचे स्वागत गीत व भव्य सत्कार सोहळा


विदर्भाची कबड्डी पंढरी म्हणून ओळखले जाणारे केळी वेळी गाव राज्यातील कबड्डी प्रेमींसाठी नवे केंद्रस्थान ठरत आहे.






News Points 

Kelivelly Kabaddi 

State Level Kabaddi 

Kabaddi 2025 

Gopikishan Bajoriya 

Jitu Thakur 

Hanuman Krida Sankul 

Akola News 

Sports News Marathi 

Kabaddi Tournament Maharashtra Sports




टिप्पण्या