भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: 24 डिसेंबर 2025 रोजी अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अंतर्गत निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी झोन क्रं. 1 अंतर्गत एकुण 38 उमेदवारांना 62 नामनिर्देशन पत्र, निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी झोन क्रं. 2 अंतर्गत एकुण 36 उमेदवारांना 56 नामनिर्देशन पत्र, निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी झोन क्रं. 3 अंतर्गत एकुण 62 उमेदवारांना 135 नामनिर्देशन पत्र, निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी झोन क्रं. 4 अंतर्गत एकुण 50 उमेदवारांना 96 नामनिर्देशन पत्र, निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी झोन क्रं. 5 अंतर्गत एकुण 35 उमेदवारांना 59 नामनिर्देशन पत्र आणि निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी झोन क्रं. 6 अंतर्गत एकुण 34 उमेदवारांना 57 नामनिर्देशन पत्र असे 6 झोन मधून एकुण 255 उमेदवारांनी 465 उमेदवारांना सशुल्क नामनिर्देशन पत्र वितरीत करण्यात आले आहे. आज दि. 24 डिसेंबर 2025 रोजी 6 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेला नाही.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – 2025-26 अनुषंगाने इच्छुक उमेव्दारांनी नामनिर्देशन पत्र ऑफलाईन सादर करावा तसेच खर्चाचा हिशोब ऑनलाईन सादर करावा.
अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक 2025-26 साठी नामनिर्देशन पत्र भरण्याची संपुर्ण प्रक्रिया ही राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार ऑफलाईन असून ईच्छुक उमेव्दारांनी सदरचा अर्ज संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे प्रत्यक्ष सादर करावयाचा आहे.
तसेच खर्चाचा जो हिशोब निवडणूक लढविणा-या ईच्छुक उमेव्दारांनी स्वत:ची ऑनलाईन साईट तयार करून दैनंदिन त्यात खर्चाची ऑनलाईन नोंद करावयाची आहे. आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी खर्चाचा हिशोब मागितल्यावर त्यांना संपुर्ण खर्चाची ऑन लाईवरून प्रिंट काढून उपलब्ध करून द्यायची आहे, तसेच खर्चाचे नमुने हे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे उमेव्दारी महिती पुस्तकासोबत उपलब्ध असून संबंधीतांनी याची नोंद घेऊन अकोला महनगरपलिका प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाव्दारा करण्यात आले आहे.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – 2025-26 च्या अनुषंगाने पथनाट्याव्दारे मनपा द्वारा मतदार जनजागृती.
अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अनुषंगाने अकोला महानगरपालिका क्षेत्रात मतदान जनजागृती करण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये तसेच मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने यांच्या मार्गदर्शनात 23 डिसेंबर 2025 रोजी अकोला महानगरपालिका क्षेत्रातील टॉवर चौक, जुने बस स्थानक परिसर आणि सातव चौक येथे लोककला व पथनाट्याव्दारे मतदार जनजागृती करण्यात आली आहे.
यावेळी पातूर येथील स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठाण व युवाश्री विशाल राखोंडे लिखीत पथनाट्य व लोककला जनजागृती कार्यक्रमातून कलावंतांनी वासुदेव व गोंधळी आणि इतर विविध भूमिका घेऊन सर्वांचे लक्ष वेधले आहेत. यावेळी विविध पथनाट्य व लोकनाट्यातून आणि लोकगीतातून मंडळाचे अध्यक्ष लोककवी सागर राखोंडे, सुखदेव उपर्वट, प्रकाश इंगोले, गजानन आवटे, कैलास शिरसाट, गणेश देवकर, श्याम उगले, विष्णू सदार, प्रज्वल इंगळे यांनी सादर केले. 'अकोलेकर वोट कर' या घोष वाक्यातून आणि विविध लोकगीतातून व पथनाट्यातून मतदारांनी मतदान करण्यासाठी वृद्ध व दिव्यांग यांना मदत करण्याकरिता व मतदान टक्क्यात वाढ होण्याकरिता आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी मनपा शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी मतदार जनजागृती हरीष इटकर, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनुप चौधरी, मनपा आयुक्त यांचे स्विय्य सहा.जितेंद्र तिवारी, जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा, संजय खराटे, सतीश वखारीया, यशवंत दुधांडे आदींची उपस्थिती होती.
508 नामनिर्देशन पत्रांचे वितरण.
23 डिसेंबर 2025 रोजी अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अंतर्गत निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी झोन क्रं. 1 अंतर्गत एकूण 61 उमेदवाराना 93 नामनिर्देशन पत्र, निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी झोन क्रं. 2 अंतर्गत एकूण 50 उमेद्वारांना 90 नामनिर्देशन पत्र, निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी झोन क्रं. 3 अंतर्गत एकुण 75 उमेव्दारांना 126 नामनिर्देशन पत्र, निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी झोन क्रं. 4 अंतर्गत एकुण 39 उमेद्वारांना 62 नामनिर्देशन पत्र, निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी झोन क्रं. 5 अंतर्गत एकुण 37 उमेव्दारांना 68 नामनिर्देशन पत्र आणि निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी झोन क्रं. 6 अंतर्गत एकुण 34 उमेव्दारांना 69 नामनिर्देशन पत्र असे 6 झोन मधून एकुण 296 उमेव्दारंनी 508 उमेव्दारंना सशुल्क नामनिर्देशन पत्र वितरीत करण्यात आले आहे. 23 डिसेंबर 2025 रोजी 6 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे एकही नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा