municipal-corporation-election: महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26: महापालिकेत विशेष नियोजन बैठक संपन्न
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करीता राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर केला असून, त्या अनुषंगाने आज 16 डिसेंबर 2025 रोजी मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्याव्दारे त्यांच्या दालनात निवडणुक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासोबत विशेष नियोजन बैठक घेण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये सर्वप्रथम मनपा आयुक्त यांनी, अकोला महानगरपालिकेच्या 20 प्रभागांसाठी होणा-या मतदान प्रक्रियेसाठी प्रत्येकी 3 आणि 4 प्रभागांचा समावेश असलेले 6 स्वतंत्र निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कार्यालये स्थापन करण्यात येणार असल्याबाबत सांगितले.
यावेळी मनपा आयुक्त यांनी, आता पर्यंत निवडणुकी संदर्भात मनपाव्दारा करण्यात आलेले कामा संदर्भात माहिती दिली. तसेच यावेळी निवडणुकीच्या कामासाठी लागणारे अधिकारी कर्मचा-यांची नियुक्त्या, प्रशिक्षण, स्ट्राँग रूम, प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये लागणारे झोनल ऑफिसर तसेच ईतर कर्मचारी आदींबाबत सखोल चर्चा करण्यात आली आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शरद जावळे, एस.एस.अपार, संतोष येवलीकर, विजय पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वि. सा. चौधरी, स्वप्नाली डलगे, प्र.ब.जाधव, मनपा उपायुक्त विजय पारतवार, दिलीप जाधव, निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे, मनपा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल देवकते, देविदास निकाळजे, राजेश सरप, गजानन घोंगे, नंदीनी दामोदर, पंकज जोगळेकर, मनपा जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा आदींची उपस्थिती होती.
मनपा प्रशासनाव्दारा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – 2025-26 अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक अधिका-यांची नियुक्ती
अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करीता मा.राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचार संहिता लागू केली असून मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ज्यामध्ये प्रभाग क्रं. 1-नांयगांव, प्रभाग क्रं. 2-आकोट फैल, प्रभाग क्रं. 7-तारफैल करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनोज लोणारकर उपविभागीय अधिकारी, आकोट यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्रं.1 म्हणून राहुल वानखडे तहसीलदार, पातुर तसेच सहा.निवडणूक निर्णय अधिकारी क्रं.2 म्हणून मुजीब रेहमान उपविभागीय अधिकारी, लघु पाटबंधारे विभाग, अकोला आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्रं.3 म्हणून विठ्ठल देवकते प्र.सहा.आयुक्त क्षेत्रीय कार्यालय उत्तर झोन क्षेत्रीय कार्यालय, मनपा अकोला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच प्रभाग क्रं. 3-जठार पेठ, प्रभाग क्रं. 4-उमरी, प्रभाग क्रं. 5-रामनगर, प्रभाग क्रं. 6-रामदासपेठ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शरद जावळे, उपविभागीय अधिकारी, अकोला यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्रं.1 म्हणून गोरी धायगुडे तहसीलदार, स.गा.यो.अकोला तसेच सहा.निवडणूक निर्णय अधिकारी क्रं.2 म्हणून मोहन व्यवहारे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि सहा.निवडणूक निर्णय अधिकारी क्रं.3 म्हणून नंदीनी दामोदर, सहायक अधीक्षक, कर विभाग, मनपा अकोला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच प्रभाग क्रं. 8-डाबकी रोड, प्रभाग क्रं. 9 भिम नगर, प्रभाग क्रं. 10 शिवाजी नगर, प्रभाग क्रं.17 हरिहरपेठ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.एस.अपार उपविभागीय अधिकारी, मर्तीजापुर यांची सहा.निवडणूक निर्णय अधिकारी क्रं.1 म्हणून पी.झेड.भोसले तहसीलदार, नझूल, जि.अकोला तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्रं.2 म्हणून वि.सा.चौधरी, उपअभियंता, का.अ.यांत्रिकी विभाग, अकोला आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्रं.3 म्हणून गजानन घोंगे, प्र.सहा.आयुक्त क्षेत्रीय कार्यालय, पश्चिम विभाग, मनपा अकोला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रभाग क्रं. 11 बाजारपेठ, प्रभाग क्रं. 12 सिव्हील लाईन, प्रभाग क्रं. 18 वाशिम रोडकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संतोष येवलीकर, उपविभागीय अधिकारी, बाळापुर यांची सहा.निवडणूक निर्णय अधिकारी क्रं.1 म्हणून राजेंद्र पाटील, तहसीलदार, मानोरा,जि.वाशिम तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्रं.2 म्हणून प्र.ब.जाधव, उप कार्यकारी अभियंता, का.अ.यांत्रिकी विभाग, अकोला आणि सहा.निवडणूक निर्णय अधिकारी क्रं.3 म्हणून पंकज जोगळेकर सहा.कर अधिक्षक क्षेत्रीय कार्यालय उत्तर झोन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रभाग क्रं. 13 पीकेव्ही, प्रभाग क्रं. 14 मलकापूर, प्रभाग क्रं. 15 गौरक्षण रोड करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजय पाटील, उप जिल्हाधिकारी, रो.ह.यो.अकोला यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्रं.1 म्हणून श्याम धनमणे, अधिक्षक, जि.का.अकोला तसेच सहा.निवडणूक निर्णय अधिकारी क्रं.2 म्हणून स्वप्नाली डलगे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, मृदा व जलसंधारण उपविभाग, अकोला आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्रं.3 म्हणून राजेश सरप प्र.सहा.आयुक्त क्षेत्रीय कार्यालय पुर्व झोन क्षेत्रीय कार्यालय, मनपा, अकोला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रभाग क्रं. 16 सिंधी कॅम्प, प्रभाग क्रं. 19 कौलखेड, प्रभाग क्रं. 20 खडकी करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निखिल खेमनार, उपजिल्हाधिकारी, महसूल, अकोला यांची तसेच सहा.निवडणूक निर्णय अधिकारी क्रं.1 म्हणून प्रज्ञा काकडे तहसीलदार शेगांव, जि.बुलढाणा, तसेच सहा.निवडणूक निर्णय अधिकारी क्रं.2 म्हणून उज्वल पटेल सहा.अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, अकोला आणि सहा.निवडणूक निर्णय अधिकारी क्रं.3 म्हणून देविदास निकाळजे प्र.सहा.आयुक्त क्षेत्रीय कार्यालय दक्षिण झोन क्षेत्रीय कार्यालय, मनपा, अकोला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा