maharashtra-politics-zp-akola: अकोट न्यायालयाचा आदेश! उबाठा जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर अडचणीत; अवैध पाणी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल




हिंगणी गावातील 4.95 लाख रुपये किमतीच्या पाणीचोरीचा आरोप; सरपंचांच्या तक्रारीनंतर दहीहंडा पोलिसात गुन्हा दाखल





ठळक मुद्दे 


गोपाल दातकर यांच्यावर 2010 पासून पाणी चोरल्याचा गंभीर आरोप


160 मि.मी. व्यासाच्या पाईपद्वारे टाकीच्या इनलेटला जोडून अवैध कनेक्शन


पाणी स्वतःच्या शेतात व घरात वापरल्याचा आरोप


सरपंच कल्पना पळसपगार यांची जिल्हाधिकारी, पोलिसांकडे तक्रार


पूर्वी कार्यकारी अभियंता व उपअभियंत्यांना पाहणीदरम्यान अवैध लाईन आढळली


त्या वेळी दातकर यांनी अधिकाऱ्यांशी अरेरावी केल्याचा आरोप


कारवाई न झाल्याने सरपंचांनी न्यायालयात धाव घेतली


अकोट न्यायालयाने आदेश दिल्यानंतर दहीहंडा पोलिसात गुन्हा नोंद


जिल्हा परिषद निवडणुका जवळ आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जिल्ह्यातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी गटनेते गोपाल दातकर यांच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. हिंगणी गावातील सरपंच कल्पना पळसपगार यांनी केलेल्या तक्रारीनंतर दहीहंडा पोलिसांनी त्यांच्या विरोधात अवैध पाणीचोरीचा गुन्हा दाखल केला आहे.


सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार, दातकर यांनी 2010 पासून गावातील पाण्याच्या टाकीला 160 मि.मी. व्यासाचा पाईप अवैधरित्या जोडला होता. या जोडणीद्वारे त्यांनी गावाच्या पाण्याचा पुरवठा स्वतःच्या शेतात आणि घरात वळवून 4,95,352 रुपयांचे पाणी चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे.


यापूर्वीही सरपंच पळसपगार यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता ग्रामपातळीवर पाहणीसाठी गेले असता अवैध कनेक्शन स्पष्टपणे आढळून आले. मात्र त्या वेळी दातकर यांनी अधिकाऱ्यांशी अरेरावी करत त्यांना हाकलून लावल्याचा आरोप आहे.


ही अवैध लाईन नंतर पाण्याच्या टाकीच्या इनलेटजवळ कापून टाकण्यात आली. तरीही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने सरपंचांनी अखेर न्यायालयात दाद मागितली. अकोट न्यायालयाने तपासाची दिशा ठरवत दहीहंडा पोलिसांना दातकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयीन आदेशानंतर अखेर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.


दरम्यान, जिल्हा परिषदेच्या निवडणुका अगदी तोंडावर असताना झालेली ही कारवाई राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आणि खळबळ माजवत आहे.




News Points 

Akola News 

Gopal Datkar 

Water Theft Case 

Hingani Village 

Dahihanda Police 

Akot Court 

Political Update 

Maharashtra Politics 

Breaking News 

ZP20




टिप्पण्या