gourav-bayaskar-murder-case: मित्रांच्या भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या; अर्धा तासात आरोपीस अटक; विधीसंर्घषीत बालक ताब्यात, एक आरोपी फरार
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज सकाळी साडेदहाच्या सुमारास हाता अंदुरा येथील गौरव गणेश बायस्कार (२४) या तरुणाची चाकूने वार करून निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली.
गौरव हा कारंजा येथील जिजामाता महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याच्या दोन मित्रांमध्ये वाद झाल्याची माहिती मिळताच तो मध्यस्थी करण्यासाठी कारंजा फाट्याजवळ पोहोचला. यावेळी तिघे–चौघे त्याच्यावर अचानक तुटून पडले आणि त्याच्या अंगावर धारधार शस्त्राने आठ ते दहा वार करत त्याला जागीच ठार केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पंकज कांबळे पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी केवळ अर्ध्या तासात विधी संघर्षित बालक आणि विजय मोरे या दोघांना ताब्यात घेतले असून एक संशयित आरोपी फरार आहे. मृतदेह अकोला शासकीय रुग्णालयात पाठवून शवविच्छेदन सुरू आहे.
दरम्यान या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अधिक तपास उरळ पोलिसांकडून सुरू आहे.
खुनाच्या गुन्हयातील आरोपी अर्ध्यातासात अटक
घटनेची हकीकत अशा प्रकारे आहे की, दिनांक ०१ डिसेंबर २०२५ रोजी गौरव गणेश बायस्कार (वय २२ वर्ष) हा त्याचा मित्र मंगेश मुरलीधर नागोलकार हे त्याचे शेतातील स्लीक्लरची शिप पलटुन घरी येत होते. दरम्यान कारंजा रमजानपुर फाटयावर राम नागोलकार, कीष्णा जीनगर, प्रणव इंगळे आणि एक अल्पवयीन मुलगा, विजय मोरे, संतोष मोरे यांच्यात आपसात भांडण सुरू असतांना दोघांना दिसले. म्हणुन मंगेश व गौरव या दोघांनी तेथे जावुन त्यांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र विजय मोरे, संतोष मोरे व आणखी एक (सर्व रां. लोहारा) हे राम नागोलकार याला चापटा बुक्यांनी मारहाण करीत होते. मंगेश व गौरव भांडणात पडून त्यांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करीत असतांनाच विजय मोरे व संतोष मोरे या दोघांनी अचानकपणे कंबरे जवळून एक एक धारधार शस्त्र काढले. विजय मोरे याने गौरव बायस्कार याच्या छातीत चाकु खुपसला व संतोष मोरे याने देखील कंबरे जवळून चाकु काढुन गौरव बायस्कार याच्या पोटावर चाकुने वार केले. तर तिसरा आरोपी ( अल्पवयीन) हा त्याला मारहाण करीत होता. त्यामुळे गौरव बायस्कार याच्या छातीतुन व पोटातुन जास्त प्रमाणात रक्त स्त्राव झाल्यामुळे गौरव बायसकार हा जागेवरच मरण पावला. तसेच राम नागोलकार याच्यावर सुध्दा चाकुने वार केला असता, त्याने तो वार चुकवुन तेथुन घाबरून पळुन गेला. गौरव गणेश बायस्कार याला जिवानिशी ठार मारणारे विजय मोरे व संतोष मोरे व तिसरा आरोपी हे तेथुन पळुन गेले,असा घटनाक्रम समोर आला.
या गुन्हयामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पंकज कांबळे, पोलीस उपनिरिक्षक गणेश कांयदे, अरूण मुंडे आदींनी तात्काळ आरोपीचा शोध घेवुन आरोपी विजय शंकर मोरे यास तात्काळ अर्ध्या तासात अटक करण्यात आले. तसेच गुन्हयातील विधीसर्घषीत बालक यास ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
News update
सदर गुन्ह्यातील फरार आरोपी संतोष मोरे (वय 36 वर्ष) याला सुद्धा आता ताब्यात घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा