flower-exhibition-akola-garden: अकोला गार्डन क्लब पुष्प प्रदर्शनी: सागर प्रधान यांनी पटकावली चॅम्पियन ट्रॉफी



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: दोन दिवसापासून अकोला शहरात सुरू असलेलं अकोला गार्डन क्लब व महाबीज द्वारे आयोजित पुष्प प्रदर्शनीचा आज समारोप झाला. 21 तारखेला प्रदर्शन बघण्याकरिता अकोलेकरांनी प्रचंड गर्दी केली होती. अकोला गार्डन क्लब द्वारे आयोजित पुष्पप्रदर्शनी मध्ये अकोला शहरातील पुष्पप्रेमी व वृक्षप्रेमी नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. 1200 प्रतियोगी यंदाच्या स्पर्धेत सहभागी झाले होते. समारोपिय कार्यक्रमानंतर महाबीजचे संचालक डॉक्टर रणजीत सपकाळ, प्रसिद्ध व्यावसायिक नितीन खंडेलवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलीस अधिकारी मनोज केदारे व अकोला गार्डन क्लबच्या संस्थापक सदस्यांपैकी  वसंत खंडेलवाल, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचं  संचलन प्राध्यापक वैशाली पाटील यांनी केलं.




एकूण 52 विविध श्रेणीमध्ये बक्षीस दिल्या गेली. त्यापैकी प्रथम पारितोषिक (चॅम्पियन ट्रॉफी) सागर प्रधान यांनी  मिळवली, तर  महाबीज द्वितीय तर तिसरे बक्षीस अनुराधा ढवळे यांना मिळालं. अतिशय प्रतिष्ठेचा समजल्या जाणार किंग ऑफ रोज हा पुरस्कार अनुराधा ढवळे यांनी पटकाविला., क्वीन ऑफ रोज हा पुरस्कार ज्योती कमलेश कोठारी यांनी मिळवला तर प्रिन्स ऑफ रोज रामेश्वर लाड यांनी मिळवला तर प्रिन्सेस ऑफ रोज हा पुरस्कार पुन्हा अनुराधा ढवळे यांनी पटकविला.

प्रियांका  पडगिलवार, राजेश लोहिया, ज्योती कमलेश कोठारी व शारदा डोंगरे यांना सुद्धा बहुसंख्य बक्षीस प्राप्त झाली. याशिवाय इतरही अनेकांनी  बक्षीस मिळवली. तर संस्थात्मक गार्डन या श्रेणीमध्ये प्रथम पारितोषिक प्रभात किड्स या शाळेने मिळवलं . 



समारोपीय कार्यक्रमाला अकोला गार्डन क्लबचे विद्यमान अध्यक्ष संजय शर्मा, , सुवर्ण महोत्सवी वर्ष अध्यक्ष अजय सेंगर, जयप्रकाश पाटील, उपाध्यक्ष सुधीर राठी, सचिव श्याम गोटफोडे, वैशाली पाटील, विजय ढवळे, सुनील कवीश्वर, नरेश अग्रवाल व दिनेश पारेख  यांच्यासह गार्डन क्लबचे इतरही पदाधिकारी उपस्थित होते.



कार्यक्रमाचं प्रास्ताविक संजय शर्मा यांनी केलं. यावेळी संस्थेचे पदाधिकारी संजय हेडा, विजय शहा, निशिकांत बडगे, श्रीकांत कोंडुलीकर, आलोक खंडेलवाल, नरेश अग्रवाल, संतोष अग्रवाल, संजय श्रावगी, संदीप महल्ले, सुधीर रांदड, कुशल सेनाड, रवी खंडेलवाल , गजानन मालोकार, सागर प्रधान, श्याम गोटफोडे, नीरज आवंडेकर, संजय आगाशे,भूषण ताजने  अर्चना सापधरे, कोकिळा पाटील, अनुराधा ढवळे, शारदा बियाणी, हीना शहा, अमिता सायानी आदींनी परिश्रम घेतले.



शहरातील गणमान्य व्यक्तींसह इतरही नागरिकांनी शेवटच्या दिवशी प्रदर्शनी बघण्याकरिता प्रचंड गर्दी केली होती.

टिप्पण्या