election-2025-voting-rights-: आधी लगीन ‘लोकशाही’चे : लग्न घटिके आधी नवरदेवाने साधला मतदानाचा मुहूर्त

सर्व छायाचित्र: भारतीय अलंकार न्यूज 24




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी आज संपूर्ण राज्यात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यघटनेने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचे महत्व जाणून मतदार उत्साहात मतदान केंद्रांकडे धावत आहेत. अशाच कर्तव्यनिष्ठ भूमिकेचे उत्तम उदाहरण बार्शीटाकळी येथे पाहायला मिळाले. येथे अंकुश ठक यांनी आपल्या आयुष्यातील अत्यंत खास दिवशी, लग्नाच्या दिवशी पहिली पायरी मतदान केंद्राकडे टाकली. बाहुल्यावर चढण्यापूर्वीच त्याने मतदान करून लोकशाहीप्रती आपली निष्ठा दाखवली.



मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्कच नाही तर कर्तव्यही आहे, हे अधोरेखित करत अंकुश यांनी सर्व मतदारांना, व्यस्त दिनक्रमात कितीही कामे असली तरी मतदानाला प्राधान्य द्या आणि आपला मतदानाचा हक्क नक्की बजावा असे आवाहन केले आहे. अंकुश ठक यांचा हा आदर्श अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे. 




लोकशाही प्रथम


अजय रामदास बनतकार हिवरखेड

या देश रक्षण करणाऱ्या एस एस बी जवानाने आज लग्नाच्या दिवशी बोहल्यावर चढण्यापूर्वी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाला प्राधान्य दिले आणि आपला मतदानाचा हक्क हिवरखेड येथे बजावला असल्याचे धिरज संतोष बजाज (हिवरखेड विकास मंच) यांनी सांगितले.





आज लग्न तिथी असल्याने बऱ्याच मतदान केंद्रावर कुठे नवरदेव तर कुठे नवरी मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे. या युवा पिढीने मतदानाचे हक्क समजले असून लग्न घटिका समीप येण्या पूर्वज आधी लगीन ‘लोकशाही’चे असं ठाणून मतदानाचा हक्क बजावून इतरांना मतदान करण्यासाठी प्रेरित करीत आहे.




टिप्पण्या