election-2025-voting-process: मतदाताच्या एका क्लिकवर अवलंबून उमेदवारांचा ‘राजयोग’; अकोला जिल्ह्यात मतदान प्रक्रियेला शांततेत सुरवात

   image: भारतीय अलंकार न्यूज 24




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : राज्यात मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज असून, आज मंगळवारी मतदानाच्या दिवशी अकोला जिल्हा नगर परिषद क्षेत्रातील १ लाख ८१ हजार ७४१ मतदार आगामी पाच वर्षांसाठी 'आपला नगराध्यक्ष, आपला नगरसेवक' निवडणार आहेत. यामुळे मंगळवारचा अमृत सिद्धी योग कुणासाठी अमृत कलश घेवून येणार, हे मतदाताच्या एका क्लिक वर अवलंबून आहे. हा योग कुणासाठी राजयोग ठरतो, हे उद्या मतमोजणीनंतर जाहीर होईल. 




जिल्ह्यातील बाळापूर वगळता चार नगर परिषदा व एका नगर पंचायतीच्या पाच नगराध्यक्षांसाठी ३०, तर सदस्यांच्या १४२ जागांसाठी रिंगणात असलेल्या ५९५ असे एकूण ६२५ उमेदवारांचे भवितव्य आज मंगळवारी मतदान यंत्रात बंद होत आहे. 


 

जिल्ह्यातील बाळापूर नगर परिषदेची निवडणूक स्थगित झाली असल्याने  उर्वरित अकोट, तेल्हारा, हिवरखेड, मूर्तिजापूर, बार्शिटाकळी या ठिकाणी निवडणुक होत आहे. ४ नगर परिषदा व एका नगर पंचायतीच्या ६६ प्रभागांसाठी आज मतदान सुरू आहे. 


नगर परिषदांच्या सदस्यांसह अध्यक्षपदासाठी ही निवडणूक होत असताना सर्वच राजकीय पक्षांसह बडे राजकीय नेते आणि स्थानिक पुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. यासाठी आज मतदान केंद्रांवर सर्वच उमेदवार अदबीने मतदारांसमोर हात जोडून उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


अकोला जिल्हा नगर परिषद 
अकोला जिल्हा नगर पंचायत

टिप्पण्या