crime-news-legal-update-court: जावयाच्या मृत्युस जबाबदार ! आरोपी साळ्यास अटकपूर्व जामीन; ॲड. नजीब शेख यांचा यशस्वी युक्तिवाद
खामगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्वाचा आदेश
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला | Shegaon Case| शेगाव येथील तरुणाने जीवन यात्रा संपविली. त्याच्या मृत्युला जबाबदार अश्या गंभीर आरोपाखाली नोंदवलेल्या गुन्ह्यातील आरोपीला खामगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या बाजूने वकिली करणारे ऍड. नजीब शेख यांच्या प्रभावी युक्तीवादाला न्यायालयाने मान्यता दिली.
प्रकरणाची सविस्तर माहिती (Case Details)
९ नोव्हेंबर २०२५ रोजी शेगाव येथील मुस्लिम कब्रस्तानात शेख जाफर शेख बब्बू कुरेशी यांनी जीवन यात्रा संपविली . त्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी मृतकाचा भाऊ शेख साबिर यांनी शेगाव पोलिसात फिर्याद नोंदवली.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, जावई शेख जाफर शेख बब्बू कुरेशी (मृतक) यांनी आपला साळा मोहसीन अनिस कुरेशी व चुलत साळा रईस शकील कुरेशी यांच्यासह भागीदारीत दूध डेअरी सुरू केली होती. व्यवसायात वाद, आर्थिक मनमुटाव आणि छळ वाढल्याने मानसिक तणाव निर्माण झाला होता.
व्यवसायातील आर्थिक वाद आणि छळ (Dispute & Harassment)
३ व ७ नोव्हेंबरला आरोपींनी डेअरीच्या चाव्या हिसकावून घेतल्या.
मृतकाला मारहाण केल्याचा आरोप.
डेअरी व्यवसायात गुंतवलेले ₹2.5 लाख परत न मिळाल्याने तणाव.
८ नोव्हेंबरला मृतक घर सोडून निघून गेला.
९ नोव्हेंबरला जीवन संपविले.
मृतकाच्या खिशात चिट्ठी सापडल्याची पोलिसांनी नोंद केली.
या आधारावर शेगाव पोलिसांनी बी.एन.एस. कलम 108 (3)(5) अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला.
अटकपूर्व जामिनासाठी अर्ज (Anticipatory Bail Application)
अटकेची शक्यता लक्षात घेऊन आरोपी शेख मोहसीन कुरेशी यांनी ऍड. नजीब शेख यांच्या मार्फत खामगाव सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला.
न्यायालयाचा आदेश (Court Order)
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, खामगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. बी. जाधव यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
या निर्णयात ऍड. नजीब शेख यांचा प्रभावी आणि मुद्देसूद युक्तीवाद निर्णायक ठरला.
ठळक मुद्दे ( News Highlights)
शेगाव प्रकरणातील आरोपीला अटकपूर्व जामीन
ऍड. नजीब शेख यांच्या युक्तीवादाला न्यायालयाची दाद
डेअरी व्यवसायातील आर्थिक वादामुळे तणाव
बी.एन.एस. कलम 108 (3)(5) अंतर्गत गुन्हा नोंद
खामगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
News Points
Shegaon Case, Akola Crime News, Anticipatory Bail, Adv Najeeb Sheikh, BNS Section 108, Khamgaon Court, Akola Legal News, Dairy Business Dispute, Abetment Case, Crime News, Legal Update Akola Live, Maharashtra News Court Orders, Breaking News
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा