court-update-crime-news-akl-: सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून आरोपी निर्दोष मुक्त

आरोपी तर्फे वकील: ॲड. चंद्रकांत वानखेडे 



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: येथील जुना शहर पोलीस स्टेशन अंतर्गत नोंदविण्यात आलेल्या अपराध क्र. 90/2015 या प्रकरणात आरोपी गणेश प्रल्हाद ताले यांना न्यायालयाने सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले आहे. 


अभियोगानुसार, आरोपीवर हा आरोप होता की, त्याने सरकारी बसच्या कंडक्टरशी वाद घालत शिवीगाळ केली व थापड मारून सरकारी कामात अडथळा निर्माण केला, आणि त्या आधारे त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332 व 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


या खटल्याच्या सुनावणी दरम्यान बचाव पक्षाचे अधिवक्ता अ‍ॅड. चंद्रकांत वानखेडे यांनी सरकारी पक्षाने सादर केलेल्या ७ सरकारी साक्षीदारांची प्रभावी प्रतिपरीक्षा केली आणि ठोस कायदेशीर युक्तिवाद पुरावाने न्यायालयाचे लक्ष वेधले. 


बचाव पक्षाच्या प्रभावी मांडणीचे व सर्व साक्षीदारांच्या साक्षींचे परीक्षण केल्यानंतर न्या. एस.आर. गायकवाड, (अ‍ॅड-हॉक जिल्हा न्यायाधीश क्र. २, अकोला) यांनी असा निष्कर्ष दिला की, अभियोजन पक्ष आरोपी विरुद्धचे आरोप शंकानिरसन पलीकडे सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे न्यायालयाने आरोपी गणेश प्रल्हाद ताले यांना निर्दोष मुक्त केले. 


या प्रकरणात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. चंद्रकांत वानखेडे यांनी यशस्वीपणे बाजू मांडली, तर अ‍ॅड. कांचन शिंदे, अ‍ॅड. असद खान, अ‍ॅड. प्रविण पोहरे, अ‍ॅड. एम. ए. परवेज अरमानी आणि अ‍ॅड. सुनीता गवई यांनी सहकारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.



टिप्पण्या