- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
sarafa-galli-trader-safety-akola: अकोल्यातील व्यापारी पुन्हा दहशतीत! सराफा गल्लीत गुंडाचा हैदोस; दुचाकींची तोडफोड, व्यापाऱ्याला मारहाण – प्रकार CCTV मध्ये कैद
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लक्षवेधी मुद्दा
अलंकार मार्केट घटनेनंतर आणखी एक धक्कादायक प्रकार; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पोलिस कारवाईकडे सर्वांचे लक्ष
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला शहरात समाजकंटकांकडून व्यापाऱ्यांना त्रास देण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी टिळक रोडवरील अलंकार मार्केटमध्ये कुलर चोरीच्या प्रयत्नातून दुकानदारावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता शहरातील सराफा गल्लीमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ मार्च रोजी सराफा गल्लीत ही घटना घडली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांची विनाकारण तोडफोड करताना दिसत आहे.
यानंतर संबंधित व्यक्ती जवळील एका सराफा दुकानात घुसून व्यापाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण करत असल्याचेही व्हिडिओ द्वारा समजते. यानंतर बाहेर येवून व्यापाऱ्यास दमदाटी करताना दिसत आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील व्यापारी, ग्राहक व नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.
घटने मागील कारण काय?
अकोला सराफा बाजारातील दुकानांसमोर अनेकांनी अतिक्रमण केलेले आहे, त्यामुळे पार्किंगसाठी जागा नाही. पर्यायाने सर्वांना आपल्या दुचाकी गाड्या दोन्हीकडेला ठेवव्या लागतात. त्यामुळे चिंचोळ्या मार्गातून वाहतूक करावी लागते. ५ मार्च रोजी एका दोन व्यक्ती एका लहान मुलाला गाडीवर बसून जात होते. चिंचोळ्या मार्गात गाडी काढताना थोडा विलंब झाल्याने एका व्यक्तीने गाडीवरून उतरून थेट धूडघूस घातला. पार्किंगमधील गाड्यांना लाथा मारून त्या खाली पाडल्यात. रांगेत उभ्या असलेल्या गाड्या जमीनीवर लोटून त्यांची नासधूस केली. एका दुकानातून हा सर्व प्रकार रत्नेश केजडीवाल पाहात होते. “तू क्या देखता रे....” असे म्हणून या गावगुंडाने त्याच्या दुकानात घुसून त्याला काहीही कारण नसताना बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे सराफा बाजाराचे जिल्हाध्यक्ष राजकुमार वर्मा यांच्या दुकानाजवळ रत्नेश केजडीवाल यांचे दुकान आहे. गावगुंडाने दुकानात घूसून केजडीवाल यांना विनाकारण मारहाण केली. मात्र आजू बाजूचे दुकानदार आणि नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका पार पाडली.
विशेष म्हणजे गाव गुंडांच्या भीती पोटी अनेक व्यापारी पोलिसांत तक्रार करण्यास पुढे येत नसल्याची माहितीही अलंकार मार्केट आणि सराफा गल्लीत घडल्या घटनेतून समोर येत आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पोलिस प्रशासन याबाबत काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अशा घटनांमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापारी संघटनांनी एकजुटीने पुढे येऊन प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी करावी तसेच लोकप्रतिनिधींनीही या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
ठळक मुद्दे :
५ मार्च रोजी अकोला शहरातील सराफा गल्लीमध्ये घटना
एका व्यक्तीकडून रस्त्यावर उभ्या दुचाकींची विनाकारण तोडफोड
त्यानंतर सराफा दुकानात घुसून व्यापाऱ्याला शिवीगाळ व मारहाण
संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद
व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल
भीतीमुळे काही व्यापारी पोलिस तक्रार करण्यास टाळाटाळ
गुंडांवर कडक कारवाईची व्यापारी व नागरिकांची मागणी
अकोला
सराफा गल्ली
akola city
akola crime
akola news
CCTV Video
crime news
maharashtra news
Sarafa Galli
Trader Safety
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा