- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
court-news-update-akola-court: दिवाणी दाव्यात ९ लाख रूपये व्याजासह देण्याचा हुकूमानामा; तर धनादेश अनादरीत प्रकरणी आरोपीस कारागृहाची शिक्षा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
फिर्यादी व वादी यांच्या तर्फे वकील सतिष एस. कोटवानी
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: दिवाणी दाव्यात ९ लाख रूपये व्याजासह देण्याचा हुकूमानामा तसेच धनादेश अनादरीत प्रकरणी आरोपी पंकज जेठाणी यास एका वर्षाची कारागृहाची शिक्षा व दंड ठोठवण्यात आला.
पंकज महेश जेठाणी यांच्या विरूध्द वादी घनश्याम अशोककुमार धनकानी यांनी वि.दि.मु.नं. १६९/२०२४ दाखल केला होता त्यामध्ये वि. ११ वे सह व्यवहार न्यायाधिश वरीष्ठ स्तर, अकोला यांनी दिंनाक ०५.१२.२०२५ रोजी अंतिम निकाल देवून हुकूमनामा पारीत केला आहे व त्यानुसार पंकज जेठाणी यांनी एकूण रू. ९,००,०००/- वादी यांना ६ टक्के दर साल दर शेकडा व्याज दराने दावा दाखल तारखेपासून व्याजासहीत देण्याबाबत हुकूमनामा पारीत केला आहे.
तसेच तकारदार घनश्याम अशोककुमार धनकानी यांनी कलम १३८ एन. आय. ॲक्ट प्रमाणे वि. ३ रे अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अकोला यांच्या न्यायालयात एस.सी.सी. क. ८११/२०२२ आणि एस.सी.सी. क्रमांक ८१०/२०२२ प्रमाणे दोन तकारी दाखल केल्या त्या तक्रारींमध्ये विद्यमान न्यायालयाने दोन्ही पक्षांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर गुणवत्तेवर अंतिम निकाल दि. २२. ०९.२०२५ जाहीर केला व आरोपीने एकूण रक्कम रू. २,००,०००/- आणि रक्कम रू. १,५०,०००/- तक्रारदाराकडे भरणा करण्याबाबत दंड ठोठावला तसेच १-१ वर्ष कारागृहात ठेवण्याची शिक्षा दोन्ही प्रकरणात ठोठावलेली आहे व दंडाची रक्कम न भरल्यास अतिरीक्त तीन महिन्याची कारागृहात ठेवण्याची शिक्षा ठोठावली आहे.
या दोन्ही प्रकरणात वादी व फिर्यादी घनश्याम धनकानी यांच्या तर्फे ॲड. सतिष एस. कोटवानी यांनी काम पाहीले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा