- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
फिर्यादीचे वकील: ॲड विद्याधर सरकटे
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: इंजिनिअर व ठेकेदाराने फिर्यादी कडून उधारीपोटी घेतलेल्या मालाचे पैसे आरोपीस वारंवार परत मागूनही मिळत नसल्याने अखेर फिर्यादीने न्यायालयात दाद मागितली. आज ३ रे अतीरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अकोला यांनी आरोपी विरुद्ध निगोशिएअबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम 138 नुसार गुन्हा सिद्ध झाल्याचे सांगुन आरोपीस २०००००/-(दोन लाख)रुपये दंड केला. व ८ दिवसाच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. नुकसान भरपाई म्हणून दंडाची रक्कम फिर्यादीस देण्याचे आदेश पारीत केले.
फिर्यादी धिरज गौतम हिरोळे (रा. खरप अकोला) यांच्या कडून आरोपी दिपक महादेव इंगळे यांनी उधारीवर माल खरेदी केला होता. उधारीवर घेतलेल्या मालाचे रकमेपोटी फिर्यादीस धनादेश दिला. धनादेश देते वेळी सदरचा धनादेश नक्कीच वटविल्या जाईल, असे आश्वासन आरोपीने दिले. तो धनादेश फिर्यादीने स्वतःचे बँक खात्यात लावले असता न वटता 'पुरेश्या निधी अभावी परत' अश्या बँक शेरासह परत आला.
यानंतर फिर्यादीने दि. १६/१०/२०२४ रोजी ॲड. विद्याधर सरकटे यांचे मार्फत रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवून रकमेची मागणी केली. परंतु आरोपीने रक्कम दिली नाही. म्हणुन फिर्यादीने अकोला येथील मुख्य यायदंडाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली. त्यामध्ये फिर्यादीने स्वतःचा व बँक अधिकारी यांचा पुरावा नोंदविला. आरोपीने स्वतःचा बचावाचा पुरावा नोंदविला.
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपलेवर ३रे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अकोला यांनी १० डिसेंबर रोजी आरोपी विरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम 138 (पराक्रम्य लेख अधिनियम) नुसार गुन्हा सिद्ध झाल्याचे सांगुन आरोपीस २०००००/-(दोन लाख) रुपये दंड ठोठावला. व ८ दिवसाच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. नुकसान भरपाई म्हणून दंडाची रक्कम २०००००/-(दोन लाख) रुपये फिर्यादीस देण्याचे आदेश पारीत केले. दंड न भरल्यास १५ दिवसाचा साधा कारावास भोगावा लागेल. न्यायालयात फिर्यादीची बाजू वकील विद्याधर सरकटे यांनी मांडली.
ॲड विद्याधर सरकटे
अकोला कोर्ट
धनादेश अनादर
akola court
akola news
cheque
Court news
court update
dishonor
NI Act
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा