ठळक मुद्दा
ऐतिहासिक लढा देत अधिवक्ता शिवम शर्मा यांची दमदार कामगिरी व प्रभावी युक्तिवादमुळे ओरिएंटल विमा कंपनीचा अपील राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, सर्किट बेंच अमरावती यांनी फेटाळला.
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करत अधिवक्ता शिवम शर्मा यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीविरुद्ध मोठा न्याय मिळवून दिला आहे. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, सर्किट बेंच अमरावती यांनी विमा कंपनीचा अपील फेटाळून ग्राहकाला २ लाख रुपयांचा विमा दावा व्याजासहित देण्याचा आदेश कायम ठेवला आहे.
थोडक्यात प्रकरण
अमित ओमप्रकाश रोहेरा यांनी कोविड काळात २ लाखांची Corona Rakshak Policy घेतली होती.
कोविड पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांना ७ ते ११ एप्रिल २०२१ दरम्यान शासकीय वैद्यकीय रुग्णालय, अकोला येथे ७२ तासांहून अधिक कालावधी करिता दाखल व्हावे लागले होते.
तरी सुद्धा विमा कंपनीने
▪ HRCT रिपोर्ट नाही
▪ SPO2 स्तर 97%
▪ Remdesivir न दिल्याचा मुद्दा
अशी “असमर्पक कारणे” देत दावा नाकारला.
न्यायालयीन युक्तिवाद
अधिवक्ता शर्मा यांनी युक्तिवादात नमूद केले की,
वरील कारणे पॉलिसीच्या शर्तींमध्ये कुठेही अनिवार्य नाहीत.
पॉलिसी स्पष्टपणे “COVID-19 पॉझिटिव्ह + किमान 72 तास रुग्णालयात राहणे” इतकीच अट घालते.
रुग्णाने सर्व वैद्यकीय कागदपत्रे नीट सादर केली आहेत.
विमा कंपनीने अन्यायकारक व मनमानी पद्धतीने दावा नाकारून सेवेत गंभीर त्रुटी केली.
आयोगाने हे सर्व मुद्दे मान्य केले व विमा कंपनीचे बचाव कारणे कायदेशीर व तथ्यात्मकदृष्ट्या अस्वीकार्य ठरली.
काय आहे आदेश
राज्य आयोगाने,
अकोला जिल्हा आयोगाचा निर्णय कायम ठेवा.
₹२,००,०००/- विमा दावा
८% वार्षिक व्याज ०४/०७/२०२२ पासून
मानसिक त्रासासाठी ₹५,०००/-
वादखर्च ₹३,०००/-
असा आदेश दिला.
तसेच आयोगाने स्पष्ट नमूद केले की,
विमा कंपनी सार्वजनिक हितासाठी कार्य करत असल्याने तिच्यावर प्रामाणिकपणे व सहृदयतेने सेवा देण्याची जबाबदारी आहे. या प्रकरणात विमा कंपनीने निष्काळजी व अन्यायकारक वर्तन केले आहे.
कायदेक्षेत्राची सकारात्मक प्रतिक्रिया
या निर्णयामुळे कोरोना काळात नाकारलेल्या इतर अनेक प्रकरणांना नवा न्यायमार्ग मोकळा होणार आहे.
अधिवक्ता शिवम शर्मा यांचे कौतूक
अकोला बार असोसिएशनमध्ये वरिष्ठ सचिव म्हणून कार्यरत असलेल्या अधिवक्ता शिवम शर्मा यांच्या युक्तिवादाचे कायदे क्षेत्रातून कौतुक होत आहे.
सामान्य ग्राहकाच्या बाजूने न्याय मिळवून देत ॲड. शर्मा यांनी सामाजिक जबाबदारी पार पाडल्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा