- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
childrens-theatre-festival-akola : विश्वास करंडक बालनाट्य महोत्सव आरंभ; आहुती नाटकाने दिली देश प्रेम व स्वातंत्र्याची प्रेरणा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: स्थानिक जे. आर. डी. टाटा स्कूल अँड ईड्यू ल्याब तर्फे आयोजित विश्वास करंडक बाल नाट्य महोत्सवाचा आज प्रमिलाताई ओक हॉलमध्ये उत्साहात शुभारंभ झाला. या महोत्सव तथा स्पर्धेचे उद्घाटन मागील वर्षी पुरुष व महिला गटात उत्कृष्ट कलावंत म्हणून प्रथम पुरस्कार पटकाविणारे बालकलावंत रुद्र कुकडकर व अनघा कुऱ्हे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महोत्सवाचे प्रमुख प्रा. मधु जाधव, निमंत्रक प्रशांत गावंडे, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे, सहप्रमुख प्रदीप अवचार, परीक्षक धनंजय सरदेशपांडे, यतीन माझीरे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी रंगदेवता नटराज व भारतरत्न जे आर डी टाटा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. टाटा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नांदी व गणेश वंदना सादर केली. महोत्सवाचे निमंत्रक प्रशांत गावंडे यांनी प्रास्ताविक करून महोत्सवाच्या आयोजनाचा हेतू विशद केला. प्रा. मधु जाधव यांचे सह उद्घाटक बालकलावंत रुद्र कुकडकर व अनघा कुऱ्हे यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
महोत्सवाचा शुभारंभ मागील वर्षी करंडक पटकविणाऱ्या प्रभात किड्स च्या आहुती या नाटकाने करण्यात आला. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या अत्याचारांशी सामना करीत देश प्रेम व स्वातंत्र्याची प्रेरणा या नाटकाच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर करण्यात आली.
जयश्री देशमुख लिखित व चंद्रकांत पोरे दिग्दर्शित या बालनाट्यात वत्सल देहाणकर, त्रिशा राठोड, आर्यन राठोड, स्वरा अवचार, सोहम पोरे, आदित्य मंत्री, अनुज खेडकर, उत्कर्ष देशपांडे, अर्णव कुलकर्णी, सर्वेश बाठे, दर्शील काकडे, पियुष लटुरीया, स्वराज वाकोडे, सौम्या इस्थापे, परम शाह, श्रीयोग नळे या बाल कलावंतांनी उत्कृष्ट भूमिका सादर केल्या.
आज दिवसभरात आहुती नाटकासह " थोडं आमचंही ऐका " खंडेलवाल इंग्लिश स्कूल अकोला, " पुकार " स्कूल ऑफ स्कॉलर अकोला, " पपेट " राजेश्वर कॉन्व्हेंट अकोला, " ऑपरेशन सिंदूर " वसुंधरा स्कूल अकोट, " घडाभर अक्कल " जुबिली इंग्लिश स्कूल अकोला, " गौरीचा प्रकाश " श्री समर्थ पब्लिक स्कूल रिधोरा, " झाडा वाली झुंबी " जे आर डी टाटा स्कूल अकोला, " देशभक्ती " मोहरी देवी खंडेलवाल विद्यालय अकोला व " वाढदिवस " जे आर डी टाटा स्कूल अकोला ही 10 बालनाट्य सादर करण्यात आलीत. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नाट्य क्षेत्रातील तज्ञ धनंजय सरदेशपांडे, यतीन माझीरे व गिरीश फडके हे काम बघत आहेत.
हा संपूर्ण महोत्सव यशस्वी करण्याकरिता जे आर डी टाटा स्कूलच्या प्राचार्य प्रतिभा फोकमारे यांच्या सह स्नेहल गावंडे, वैशाली बोधनकर, कल्याणी दलाल, रश्मी गावंडे, रितेश महल्ले अविनाश कुलकर्णी, कांचन भोरे, आरती देशमुख, माधव जोशी,संदीप शेवलकर, अंकुश इंगळे, आदी परिश्रम घेत आहेत. आजच्या सोहळ्याचे संचलन व आभार प्रदर्शन ओजस्विनी देशमुख यांनी केले.
महोत्सवाच्या शुभारंभ सोहळ्यास अरुण घाटोळे, अनिल कुलकर्णी, रमेश थोरात, डॉ. सुनील गजरे, सरिता वाकोडे यांचे सह नाट्य क्षेत्रातील इतरही मान्यवर व नाट्य रसिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
12 डिसेंबर रोजी सादर होणारी बालनाट्ये
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 डिसेंबर रोजी " दप्तर " जे आर डी टाटा स्कूल अकोला, " आणि सदाफुली रंगीत झाली " ज्ञान दर्पण इंग्लिश स्कूल अकोला, " आनंदाचे झाड " स्कूल ऑफ स्कॉलर अकोला, " कन्साडी.. एक परिक्रम " श्री संताजी कॉन्व्हेंट अकोला, " वीर तानाजी.. स्वराज्यस्य सिंह " स्कूल ऑफ स्कॉलर अकोला, " जाने कहा गये वो दिन " प्लॅटिनम जुबिली स्कूल अकोला, " असं कसं " विवेकानंद इंग्लिश स्कूल अकोला, " आरसा " जुबिली इंग्लिश स्कूल कुंभारी, " वृक्षवल्ली आम्हा सोयरे " मनुताई कन्या शाळा अकोला , " मोबाईल मायाजाल " गीतांजली विद्यालय अकोला , " लेक वाचवा हो " भारत विद्यालय अकोला ही 11 बालनाट्य सादर करण्यात येतील.
विनामूल्य प्रवेश असलेल्या या महोत्सवाचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा