childrens-drama-competition-: विश्वास करंडक बालनाट्य स्पर्धा;‘वीर तानाजी’ संस्कृत नाटकाने जागविला शिवकालीन इतिहास
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: स्थानिक कौलखेड परिसरातील स्कूल ऑफ स्कॉलर स्कूलने ‘वीर तानाजी --- स्वराज्यस सिंह’ हे संस्कृत भाषेतील ऐतिहासिक नाटक सादर करून शिवकालीन इतिहास जागविला. विश्वास करंडक बाल नाट्य स्पर्धेच्या रंगमंचावर संस्कृत भाषेत नाटक सादर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. " आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे " या इतिहासात गाजलेल्या जोश पूर्ण प्रतिज्ञेवर आधारित या नाटकाने स्पर्धेचा दुसरा दिवस गाजविला.
" वीर तानाजी " या नाटकाच्या अनुवाद, लेखन व दिग्दर्शनाची जबाबदारी स्वप्ना लांडे यांनी पार पाडली. सहाय्यक शिक्षिका भारती काळे व उज्वला कावरे यांनी त्यांना सहकार्य केले. सदर नाटकात किंजल पालखेडे, सिद्धी ठाकूर, स्वराज गावंडे, स्पृहा फुलाने, अन्वित चव्हाण, मिहीर केतकर, देवस्वी काळे, रजत गिरी, अथर्व आव्हाळे, सनी भोकरे, तनवी पाटील, भिमरत्न पळसपगार, स्पर्श जोशी व स्वराली राऊत या बालकलावंतांनी ऐतिहासिक वेशभूषेत उत्तम भूमिका वठवील्या.
या स्पर्धेत सादर करण्यात येणाऱ्या विविध बालनाट्यांमुळे अकोलेकर रसिकांना उत्तम नाटकांची मेजवानी मिळत आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी 12 डिसेंबर रोजी सादर करण्यात आलेल्या व एकापेक्षा एक सरस असलेल्या या नाटकांमध्ये ज्ञानदीप इंग्लिश स्कूल अकोलाचे " आणि सदाफुली रंगीत झाली, स्कूल ऑफ स्कॉलर अकोलाचे " आनंदाचे झाड " श्री संताजी कॉन्व्हेंट अकोला चे " कसांडी एक परिक्रमा , प्लॅटिनम जुबली स्कूल अकोलाचे " जाने कहा गये वो दिन " विवेकानंद इंग्लिश स्कूल अकोला चे " असं कसं " , जुबिली इंग्लिश स्कूल कुंभारी चे " आरसा " , मनुताई कन्या शाळा अकोला चे " वृक्षवल्ली आम्हा सोयरे " , गीतांजली विद्यालय अकोलाचे " मोबाईल मायाजाल " व भारत विद्यालय अकोला चे ' लेक वाचवा हो " या नाटकांचा समावेश आहे.
या संपूर्ण नाट्य महोत्सवाची जबाबदारी महोत्सवाचे प्रमुख प्रा. मधु जाधव, निमंत्रक प्रशांत गावंडे, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे, जे आर डी टाटा स्कूलच्या प्राचार्या प्रतिभा फोकमारे, स्नेहल गावंडे व त्यांचे सहकारी सांभाळीत आहेत. रसिक प्रेक्षकांचा भरभरून मिळालेला प्रतिसाद हे यावर्षीच्या नाट्य महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.
13 डिसेंबर रोजी सादर होणारी नाटके
स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी एकूण 8 नाटकांचे सादरीकरण होईल. त्यात जेआरडी टाटा स्कूलचे " बिंदू संदेश " प. पु. श्री हेडगेवार माध्यमिक शाळा अकोला चे " बोन्साय ", एज्युविला पब्लिक स्कूल पातुर चे " लाली ", किड्स झोन इंग्लिश मीडियम स्कूल बार्शीटाकळीचे " कष्टाची जाणीव " , सातपुडा इंग्लिश स्कूल वरवट बकालचे " अण्णा " , व स्कूल ऑफ एक्सलन्स अमरावतीचे स्वयंपूर्ण , आर. जे. चवरे हायस्कूल कारंजा लाड चे " खेळताड " व डॉ. नीना वंदे आदर्श विद्यालय वरूड, अमरावती चे " जैसा राजा तैसी प्रजा " या नाटकांचा समावेश आहे.
बक्षीस वितरण समारंभ
तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार दि. 13 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी प्रमिलाताई ओक सभागृहात होईल. भारत सरकारच्या फिल्म डिव्हिजनचे संकलक तथा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे परीक्षक विनय वैराळे यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात येतील. सर्व विजेत्या कलावंतांना करंडकासह रोख बक्षीसे व प्रमाणपत्रांचे वितरण अतिथींच्या हस्ते करण्यात येईल. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व शाळांनी आपल्या कलावंतासह याप्रसंगी उपस्थित राहावे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा