akola-municipal-election-2026: अकोला महानगरपालिका निवडणूक 2026 : काँग्रेस–राकाँ युती निश्चित; 24 वॉर्डमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) चे उमेदवार निवडणूक रिंगणात
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला | अकोला महानगरपालिका निवडणूक 2026 साठी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्यात अधिकृत युती निश्चित झाली आहे. या युतीअंतर्गत एकूण 80 वॉर्डांपैकी 24 वॉर्डमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवत असून उर्वरित 56 वॉर्डमध्ये काँग्रेस पार्टी आपले उमेदवार देणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तर्फे जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे आहे.
वॉर्ड क्रमांक 2
– रमेश दीपक नाईक
वॉर्ड क्रमांक 6
– बुंदले गीताबाई ओमप्रकाश
– पाटोले मकरंद शशिकांत
वॉर्ड क्रमांक 8
– रविंद्र बालासाहेब नापाडे
– रुपाली महेश इंगळे
– अल्ताफ खान अब्दुल्ला खान
वॉर्ड क्रमांक 9
– राजेश रतन नेचाने
– सुनीता अरविंद मूर्ती
– सानिया राजिक खान
– सुनील वासुदेव वानखडे
वॉर्ड क्रमांक 11
– साहिदा बी. शेख मेहबूब मंतवाले
वॉर्ड क्रमांक 12
– संदीप दुर्गादास तायडे
वॉर्ड क्रमांक 15
– संगीता आनंद वानखडे
– बुशरा जवीद तौसीफुद्दीन
वॉर्ड क्रमांक 16
– इशरत हुसेन शाकिर प्रवीण
– अमरीन सदाफ सैयद नाझिम
– मोहम्मद रफीक मोहम्मद सिद्दीकी
वॉर्ड क्रमांक 17
– बाबा साहेब भुमरे
वॉर्ड क्रमांक 18
– उमेश सुरेश इंगळे
– अविनाश चौहान
वॉर्ड क्रमांक 19
– अमोल उत्तमराव इंगळे
– नंदकिशोर विठ्ठल ठाकरे
– श्रद्धा प्रफुल्ल कोल्हे
– पूजा पंकज गावंडे
वरील सर्व उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांचे अधिकृत उमेदवार असून, महानगराध्यक्ष रफीक सिद्दीकी आणि कार्याध्यक्ष देवानंद ताले, सैयद यूसुफ अली यांच्या हस्ते त्यांना पक्षाचे महत्त्वाचे दस्तऐवज असलेले फॉर्म ‘ए’ व फॉर्म ‘बी’ प्रदान करण्यात आले आहेत.
दरम्यान, काँग्रेस पक्षासोबत सुरू असलेल्या पुढील चर्चेनुसार युतीच्या धोरणात्मक निर्णयांतर्गत 2 ते 3 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मागे (विड्रॉल) घेतले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे प्रदेश संघटन सचिव जावेद जकरिया यांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा