winter-2025-foggy-morning-akl: थंडीची लाट तीव्र! अकोल्यात तापमान 10 अंशांनी कोसळले; मोर्णा नदी परिसर दाट धुक्याने वेढला, पुढील काही दिवस कडाक्याची थंडी कायम




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : राज्यभर थंडीची लाट तीव्र होत असून तापमानात अचानक मोठी घसरण नोंदवली जात आहे. अकोल्यात गेल्या आठवड्यात तापमान तब्बल 10 अंश सेल्सिअसने घसरले असून सध्या शहराचे किमान तापमान 12.5°C नोंदवले गेले आहे. कडाक्याच्या थंडीची चाहूल आजूबाजूला ठळकपणे जाणवत आहे.


शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीवर दाट धुक्याची चादर पसरली असून पाण्यावरून जणू थंड वाफा उठत आहेत, असा भास होत आहे. पहाटेच्या सुमारास नदीकाठचा संपूर्ण परिसर धुक्यात हरवल्याचे दृश्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.


हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी गरम कपड्यांचा वापर, रात्री अनावश्यक बाहेर जाणे टाळणे आणि लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घेणे, असा सल्ला देण्यात आला आहे.





News Points 


Akola Weather 

Cold Wave 

Akola News 

Morna River 

Winter 2025

Maharashtra Weather 

Cold Alert 

Temperature Drop 

Weather Update 

Foggy Morning




टिप्पण्या