shivsena-party-ladaki-soon-: “लाडकी सून” च्या मदतीला धावून आली शिवसेना! विवाहितेचा छळ प्रकरणी तात्काळ कारवाई; पती पोलिसांच्या ताब्यात
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर राबविलेल्या ‘लाडकी बहीण’ आणि त्यानंतरच्या ‘लाडकी सून’ या उपक्रमांतर्गत महिलांवरील छळ रोखण्यास व त्यांना त्वरित न्याय मिळवून देण्यास शिवसेना-शिंदे गट सक्रियपणे पुढाकार घेत आहे. अकोल्यात घडलेल्या एका प्रकरणाने या उपक्रमाचा प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.
अकोल्यातील एका सुशिक्षित युवकाकडून पत्नीला सातत्याने छळ व मारहाण केली जात असल्याची माहिती शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ पुढे सरसावत पीडित महिलेला मानसिक आधार दिला. महिलेची सुरक्षितता लक्षात घेऊन शहर प्रमुख योगेश अग्रवाल व शिवसेना कार्यकर्त्यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहून पीडितेला धीर दिला.
पोलिसांनीही महिलेकडून तक्रार प्राप्त होताच तातडीने कारवाई करत, छळ करणाऱ्या पतीला ताब्यात घेतले. या हस्तक्षेपामुळे पीडितेला मोठा मानसिक दिलासा मिळाला असून ‘लाडकी सून’ योजनेचे प्रत्यक्ष परिणाम समाजासमोर स्पष्टपणे दिसून येत आहेत.
शिवसेनेच्या तात्काळ कृतीमुळे आणखी एक महिला अन्यायाच्या कचाट्यातून बाहेर पडत असल्याचे समाधान नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा