भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : अकोला महापालिकेच्या आज नव्या आरक्षणाची लॉटरी काढण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार यंदाच्या आरक्षणात महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले असून विशेषत: ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षणात मोठे बदल दिसून आले.
नवीन आरक्षणानुसार प्रभाग ३ (ब), १० (अ) आणि १४ (ब) या तीन जागा ओबीसी महिला प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. प्रभाग १४ मधील क भागावरील सर्वसाधारण महिला आरक्षण रद्द करण्यात आले आहे.
तसेच, प्रभाग १ मध्ये अ भाग ओबीसीसाठी राखीव, तर क भाग खुल्या प्रवर्गात कायम ठेवण्यात आला आहे.
प्रभाग ३ मधील क भाग यापूर्वी महिलांसाठी राखीव असला तरी आता तो सर्वसाधारण प्रवर्गात समाविष्ट करण्यात आला आहे, तर ३ मधील ब भाग ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
प्रभाग ११ अ मधील महिला ओबीसी आरक्षण बदलून ओबीसी प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेनंतर मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी आरक्षण फेरबदलाची माहिती देत, पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने लॉटरी प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले.
अकोला महानगरपालिका नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण नव्याने निश्चित
अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – 2025 करीता आज दि. 17 नोव्हेंबर 2025 रोजी अकोला महानगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह येथे नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला व सर्व साधारण महिला यांचे आरक्षण थेट व सोडत पध्दतीने निश्चित करण्यात आले. यावेळी महानगरपालिका गुजराती शाळा क्रं. 1 चे वर्ग 4 चे विद्यार्थी अजय सनासिंधव, नितू मीठा भरवाड यांच्याद्वारे सोडत काढण्यात आली.
यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, उपायुक्त दिलीप जाधव, निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे, आयुक्त स्विय्य सहायक जितेंद्र तिवारी जी.आय.एस.विभागाचे चंदन प्रसाद, संगणक विभाग प्रमुख हेमंत रोजतकर, शुभम अहेरकर, महेश राऊत, गोपाल बाहेकर, निलम खत्री, मैथिली बोबडे यांचेसह ईतर कर्मचा-यांची उपस्थिती होती.
अकोला महानगरपालिका नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण नव्याने निश्चित करण्याचे आयोगाचे आदेश
अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – 2025 करीता दि. 11 नोव्हेंबर 2025 रोजी प्रमिलाताई ओक हॉल सभागृह येथे अनुसुचित जाती महिला, अनुसुचित जमाती महिला व ईतर मागास वर्ग महिला तसेच सर्व साधारण महिला यांचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात येउन राज्य निवडणूक आयोगाचे मान्यता करिता पाठविण्यात आले होते.
सदर आरक्षणातील अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व ईतर मागास वर्ग प्रवर्ग सोडतीव्दारा निचिश्त केलेले आरक्षण राज्य निवडणूक आयोग यांनी यथास्थिती ठेवून ईतर मागास वर्ग प्रवर्ग व सर्व साधारण महिला आरक्षण पुन्हा सोडतीव्दारे निश्चित करण्याबाबत कळविले. त्याकरिता शासनाने 20 मे 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या तरतुदीमधील नियम 6 (3) व 6 (4) नुसार नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला व सर्व साधारण महिला यांचे आरक्षण निश्चित करून राज्य निवडणूक आयोगाचे मान्यतेकरीता तात्काळ पाठवावे, असे निर्देशीत केले.
त्या अनुषंगाने नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला व सर्व साधारण महिला यांचे आरक्षण थेट व सोडत पध्दतीने निश्चित करण्याकरिता आज सोमवार 17 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता अकोला महानगरपालिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह येथे सोडत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
असे आहे नवे आरक्षण
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा