nagarparishad-election-2025: निवडणुकीचा ज्वर वाढत असताना घराणेशाहीचे ‘VIP कार्ड’ पुन्हा सक्रिय; खतीब आणि पिंपळे कुटुंबाची एंट्री चर्चेत
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: राज्यात नगरपरिषद व ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम वाजताच उमेदवारांच्या ‘घरगुती राजकारणा’चा धडाका पुन्हा एकदा स्पष्ट जाणवू लागला आहे. पक्षांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या घोषणा केल्या तरी उमेदवारीच्या याद्यांमध्ये कुटुंबीयांचा दबदबा कमी होताना दिसत नाही. “कुटुंब” हा घटक अजूनही राजकारणात VIP पाससारखा काम करताना दिसतोय.
बाळापुर : खतीब कुटुंबाची पुन्हा मैदानात दमदार एन्ट्री
बाळापुर नगरपरिषद अध्यक्षपदासाठी वंचित बहुजन आघाडीने रजिया बेगम खतीब यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या नावामागे एक मोठा ‘कुटुंबीय ट्विस्ट’ आहे.
रजिया बेगम या वंचितचे नेते व काँग्रेसचे माजी आमदार नतिकोद्दीन खतीब यांच्या पत्नी आहेत.
खास बाब म्हणजे—
रजिया बेगम यांचे हे दुसरे इनिंग, त्या याआधीही नगराध्यक्ष राहिल्या आहेत.
नतिकोद्दीन खतीब यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून वंचितकडे आले आणि आता पुन्हा पत्नीला प्रमुख पदासाठी मोलाचा पाठिंबा देत आहेत.
बाळापूरमध्ये खतीब कुटुंबाची उपस्थिती निवडणूक रंगतदार बनवणार यात शंका नाही.
मुर्तीजापूर : पिंपळे बंधूंची ‘दुसरी इनिंग’ चर्चेत
मुर्तीजापुरमध्येही घरगुती राजकारणाची झळक स्पष्ट जाणवते.
येथील भाजपचे विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांचे मोठे भाऊ भूपेंद्र पिंपळे पुन्हा एकदा नगरसेवक पदासाठी रिंगणात उतरले आहेत.
भूपेंद्र पिंपळे यांचेही हे दुसरे इनिंग
निवडणुकीचा शंखनाद होताच पिंपळे कुटुंबातील धावपळ वाढली असल्याचे कार्यकर्ता सांगतात.
मतदारांची टीका : “राजकारण बदललं, उमेदवार तेच”
घराणेशाही संपल्याचा दावा वारंवार केला जात असला तरी प्रत्यक्षात उमेदवारांची यादी मात्र वेगळीच कथा सांगते.
सर्वसामान्य मतदारांचा सूर—
“राजकारण बदलतंय… पण उमेदवार अजूनही घरातूनच येतो!”
बाळापुर असो वा मुर्तीजापुर, कुटुंबीय राजकारणाची तीव्रता या निवडणुकीतही ठळकपणे जाणवते.
News Points
Balapur, Murtizapur, NagarpanchayatElection, Nagarparishad2025, PoliticalDynasty, Gharaneshahi, VanchitBahujanAghadi, RajiyaBegumKhatib, NatikoddinKhatib, BJP, HarishPimpale, BhupendraPimpale, AkolaNews, PoliticalNewsMarathi, MaharashtraPolitics
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा