maharashtra-politics-vba-akola : सरकारच्या ३१ हजार कोटींच्या वाटपावर प्रकाश आंबेडकरांचा सवाल



ठळक मुद्दा 

शेतकऱ्यांना मिळालेला मोबदला इन्शुरन्सचा… मग सरकारने नेमके काय दिलं?





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना ३१ हजार कोटी रुपये वाटण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला. मात्र हा पैसा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळाला आहे का? असे विचारत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर गंभीर आरोप केले.

यशवंत भवन, अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


आंबेडकरांनी उपस्थित केलेले महत्त्वाचे प्रश्न

शेतकऱ्यांना मिळालेला मोबदला हा सरकारचा नसून इन्शुरन्सचा आहे.

शेतकऱ्यांनी वैयक्तिकरित्या इन्शुरन्स काढला… त्याचाच पैसा त्यांना मिळाला.

सरकारने दिल्याचा दावा असलेल्या ३१ हजार कोटींचा खुलासा तात्काळ करावा.

खुलासा झाला नाही तर हा पैसा सत्ताधारी, आमदार-खासदार आणि कार्यकर्त्यांनी पळवला, असे समजावे – आंबेडकर.

शेतकऱ्यांना दिशाभूल करणारे आकडे दाखवले जात असल्याचा आरोप.


आंबेडकरांचा सरकारला थेट सवाल

"३१ हजार कोटी रुपये कुठे वाटले? कोणाला मिळाले? याची यादी जाहीर करा. अन्यथा हा पैसा पळवला गेला असे समजू."


शेतकऱ्यांच्या मोबदल्यावरून वाद वाढणार?

राज्यातील नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भरपाईवरून राजकारण तापण्याची शक्यता वाढली आहे. इन्शुरन्स कंपनीकडून मिळालेल्या रकमेला सरकारची मदत म्हणून दाखवल्याचा आंबेडकरांचा आरोप आता चर्चेत आहे.


News Points 

PrakashAmbedkar VanchitBahujanAghadi FarmersIssue 31ThousandCrore MaharashtraPolitics AkolaNews FarmersCompensation InsuranceClaim PoliticalNewsMarathi Breakingnews 


टिप्पण्या