भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शहरातील बहुचर्चित एका चोरी प्रकरणातील आरोपीला सहा दिवसात जामीन मिळाला आहे. सोशल मीडिया साठी रिल्स बनविण्याच्या बहाण्याने एका युवतीने (मुख्य आरोपी) आपल्या शेजारी राहणाऱ्या महिलेस घरी बोलावून, नंतर तिच्या घरात घुसून सोने, रोख ऐवज चोरी केल्याची घटना जूने शहर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. या प्रकरणातील एका सह आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने आज मंजूर केला आहे.
सागर कॉलनी वाशीम बायपास अकोला येथे घडलेल्या सोने व रोख रक्कम चोरी प्रकरणात, 13 फेब्रुवारी 2026 रोजी जुने शहर पोलीस स्टेशन अकोला येथे भारतीय न्याय संहितेच्या कलम 305, 331(3), 3(5) अंतर्गत आरोपींवर गुन्हे दाखल करून चार आरोपीस अटक करण्यात आली होती.
यामधील सह आरोपी समीर प्रदीप तेलखडे (रा.आरटीओ रोड बचत भवन अमरावती) याने अधिवक्ता ॲड. आकाश गुलाबराव हिवराळे, ॲड. शुभम किशोर करडीले यांच्या मार्फत अकोला न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
अधिवक्ता ॲड. आकाश हिवराळे, ॲड. शुभम करडीले यांनी न्यायालयात आरोपी समीर याच्या वतीने प्रभावी युक्तिवाद करत सदर गुन्ह्यात आरोपी समीर तेलखडे याचा काही संबंध नसल्याचा विद्यमान न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले.
यानंतर सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यावर आरोपीचे ॲड. आकाश हिवराळे, ॲड. शुभम करडीले यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून, आरोपी समीर तेलखडे याचा जामीन अर्ज प्रथम श्रेणी न्यादंडाधिकारी कोर्ट क्र.1 अकोला यांनी मंजूर केला. यामुळे आरोपी समीर तेलखडे आणि त्याच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.
ॲड. हिवराळे, ॲड. करडीले यांना ॲड. प्रभंजन गणेशराव अवताडे, आदित्य अवचार आदींनी सहकार्य केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा