भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–नागपूर आणि अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे.
नागपूर ते मुंबई एकेरी विशेष गाड्यांचे तपशील
विशेष गाडी क्रमांक ०१२६० दि. ०४.१२.२०२५ रोजी नागपुर येथून १८.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल.
विशेष गाडी क्रमांक ०१२६२ दि. ०४.१२.२०२५ रोजी नागपुर येथून २३.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १५.०५ वाजता पोहोचेल.
विशेष गाडी क्रमांक ०१२६४ दि. ०५.१२.२०२५ रोजी नागपुर येथून ०८.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल.
विशेष गाडी क्रमांक ०१२६६ दि. ०५.१२.२०२५ रोजी नागपुर येथून १८.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल.
थांबे : अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगांव, धामणगांव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापुर, भुसावल, जलगांव, चाळिसगांव, मनमाड, नासिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर.
संरचना: १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅन.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर एकेरी विशेष गाड्यांचे तपशील
विशेष गाडी क्रमांक ०१२४९ दि. ०६.१२.२०२५ रोजी मुंबई येथून २०.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ११.२० वाजता पोहोचेल.
विशेष गाडी क्रमांक ०१२५३ दि. ०७.१२.२०२५ रोजी दादर येथून ००.४० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल.
विशेष गाडी क्रमांक ०१२५१ दि. ०७.१२.२०२५ रोजी मुंबई येथून १०.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ००.५५ वाजता पोहोचेल.
विशेष गाडी क्रमांक ०१२५५ दि. ०७.१२.२०२५ रोजी मुंबई येथून १२.३५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.०० वाजता पोहोचेल.
विशेष गाडी क्रमांक ०१२५७ दि. ०८.१२.२०२५ रोजी मुंबई येथून ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल.
थांबे : दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगांव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव, पुलगांव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी.
संरचना: १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅन.
अमरावती- मुंबई अनारक्षित विशेष गाडी
विशेष गाडी क्रमांक ०१२१८ दि. ०५.१२.२०२५ रोजी अमरावती येथून १७.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०५.४५ वाजता पोहोचेल.
विशेष गाडी क्रमांक ०१२१७ दि. ०७.१२.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ००.४० वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १२.५० वाजता पोहोचेल.
थांबे: बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई.
संरचना: १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅन.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वे, भुसावल मंडळ व अकोला रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा