भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: ज्येष्ठ पत्रकार निलकंठ पाटील उर्फ नि. ग. पाटील यांचे आज सोमवार 3 नोव्हेंबर रोजी वार्धक्यामुळे निधन झाले. मृत्युसमयी ते 95 वर्षाचे होते. ते बऱ्याच वर्षा पासून आजारी होते. त्यांचे मागे सुन, तीन नातू व मोठा आप्त परिवार आहे.
सुरवातीला अकोला नगरपालिका मध्ये कर्मचारी म्हणून त्यांनी कार्य केले. तत्कालीन अकोला नगर परिषदेचे जनसंपर्क अधिकारी म्हणून श्री पाटील यांनी काम करताना सर्वच वृत्तपत्र प्रतिनिधी, वार्ताहर यांना सदैव समान व आपुलकीची वागणूक दिली. बातमी लिहिण्यात त्यांचा विशेष हातखंडा होता.
सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी दैनिक महासागर, दैनिक शिवशक्ती व दैनिक हिंदुस्थान या वृत्तपत्रामध्ये वार्ताहर म्हणून कार्य केले. अकोला जिल्हा पत्रकार संघाने नि ग पाटील यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरविले होते. मधुर बोलणे व काम करणे हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य होते.
अकोला नगरपालिकाचे तत्काळीन मुख्याधिकारी नि. द. वैद्य यांच्या सोबत राहून त्यांनी नगर पालिकेत काम केले. सेवानिवृत्ती नंतर पत्रकारितेच्या क्षेत्रात नि. ग. पाटील यांनी कार्य केले. ते अकोला जिल्हा पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य होते. ते आजारी असताना जिल्हा पत्रकार संघाने पुढाकार घेऊन शासना कडून स्व. शंकरराव चव्हाण कल्याण निधीतुन उपचारासाठी पहिली आर्थिक मदत मिळवून दिली होती.
मूळचे बाखराबाद ता. बाळापूर येथील निवासी नि. ग. पाटील माळी हे नंतर अकोल्यात स्थायीक झाले होते. प्रदीर्घ आजारा नंतर आज त्यांची प्राण ज्योत मालवली. अकोला जिल्हा पत्रकार संघा चे वतीने ज्येष्ठ पत्रकार स्व. नि. ग. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांचा अंत्यविधी अकोला मलकापूरच्या स्मशान भूमी मध्ये दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येईल, असे त्यांच्या परिवारा कडून कळविण्यात आले आहे.
....……………...
भारतीय अलंकार न्यूज 24 आणि शिंगणे परिवार कडून ज्येष्ठ पत्रकार नि. ग. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मुख्य संपादक
ॲड. नीलिमा शिंगणे जगड,
भारतीय अलंकार न्यूज 24
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा