भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : फिर्यादी रघुनाथ अरबट यांनी दिलेल्या तक्रारीवरून दाखल झालेल्या फसवणूक प्रकरणात आरोपी सागर कान्हेरकर याला अकोल्याच्या विद्यमान मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने नियमित जामिन मंजूर केला आहे. या प्रकरणात ॲड. राकेश पाली यांनी आरोपींच्या वतीने प्रभावी युक्तिवाद केला.
प्रकरणाची पार्श्वभूमी
फिर्यादीने 24 ऑगस्ट 2025 रोजी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली होती. त्यात आरोपी सागर कान्हेरकर यांनी मजूर, शेतकरी व ट्रॅक्टर चालकांना पगार देण्याच्या नावाखाली ₹32,00,000/- रक्कम स्वतःच्या खात्यात मागवून घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच फिर्यादीचे वहिखाते व धनादेश चोरी केल्याचीही तक्रारीत नोंद आहे.
सदर तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 3(5) व 316(4) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती.
न्यायालयातील युक्तिवाद
आरोपींच्या वतीने ॲड. राकेश पाली यांनी सविस्तर युक्तिवाद करत जामिनासाठी विनंती केली. तर फिर्यादी तर्फे सरकारी वकिलांनी ₹32 लाखांची रक्कम जप्त करणे आवश्यक आहे, तसेच आरोपी जामिनावर सुटल्यास साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असल्याचे सांगत जामिनास विरोध केला.
न्यायालयाचा निर्णय
दोन्ही बाजू ऐकल्यानंतर, विद्यमान मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी ॲड. राकेश पाली यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीला नियमित जामिन मंजूर केला.
या प्रकरणात ॲड. राकेश पाली यांना ॲड. आनंद साबळे, ॲड. कल्याणी तायडे आणि ॲड. खुशी पाली यांनी सहकार्य केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा