ठळक मुद्दे
मुर्तिजापूरमध्ये आचारसंहिता पथकाची कारवाई!
वाहनातून ₹२.३० लाखांची रक्कम जप्त.
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर SST पथक सक्रिय,
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू.
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : मुर्तिजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी स्थिर निरीक्षण पथक (SST) सक्रिय झाले असून, मंगळवारी (दि. १२ नोव्हेंबर) सकाळी मोठी कारवाई करण्यात आली.
सकाळी ७.१० वाजता आसरा फाटा, नॅशनल हायवे मुर्तिजापूर येथे स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक ४ ने MH ३१ CR ८६१९ क्रमांकाचे वाहन तपासले असता, वाहन चालक योगेश अनिल कनोजे यांच्या ताब्यातून ₹२,३०,३००/- इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली.
वाहन चालकाकडून सदर रक्कम कोणत्या कारणासाठी व कुठून आणली याबाबत समाधानकारक पुरावे सादर न केल्याने, पथक प्रमुख चंदू महादेव तायडे व त्यांच्या पथकाने पंचनामा करून रक्कम जप्त केली.
ही कारवाई निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नियंत्रण अधिकारी निलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील कार्यवाही नोडल अधिकारी प्रसाद राठोड, वैभव ओहेकर आणि राजेश भुगुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानंतर तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण अकोला जिल्ह्यात निवडणुकीच्या काळात अनधिकृत पैशाचा वापर रोखण्यासाठी विविध पथकांकडून गस्त आणि नाकाबंदी वाढविण्यात आली आहे.
नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणतीही संशयास्पद आर्थिक देवाणघेवाण अथवा आचारसंहितेचे उल्लंघन आढळल्यास त्वरित निवडणूक नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा