devendra-fadanvis-publicmeet: हिवरखेडात इतिहास घडणार! मुख्यमंत्री फडणवीसांची २५ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : सर्वस्पर्शी विकासाच्या ध्येयाने कार्यरत राहणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २५ नोव्हेंबर, मंगळवार रोजी हिवरखेड (ता. तेल्हारा) येथे भव्य जाहीर सभेला संबोधित करणार असून या ऐतिहासिक सभेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. देशमुख यांचा मळा, एसटी स्टँड जवळ सकाळी साडेअकरा वाजता ही सभा आयोजित करण्यात आली आहे.



भाजपा विजयासाठी महत्त्वाची सभा


भाजपा नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस हे हिवरखेडात उपस्थित राहणार आहेत.

पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून फडणवीस यांच्या नेतृत्वात आतापर्यंत ११ नगराध्यक्ष व १०१ नगरसेवक अविरोध निवडून आल्याची माहिती देण्यात आली.


दोन हजार कार्यकर्त्यांकडून तयारी


या सभेच्या यशासाठी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २ हजार कार्यकर्ते तयारीत गुंतले आहेत.





मान्यवरांची उपस्थिती


या कार्यक्रमात खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत :


पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर


खासदार अनुप धोत्रे


आमदार रणधीर सावरकर


आमदार प्रकाश भारसाकडे


आमदार हरीश पिंपळे


आमदार वसंत खंडेलवाल


भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर


जयंत मसने


विजय अग्रवाल


तसेच भाजपाचे इतर पदाधिकारी






अयोध्येतील धार्मिक कार्यक्रमाशी विशेष संयोग


याच दिवशी अयोध्या येथे


धर्मध्वजाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत


संघप्रमुख डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते


राम-जानकी विवाह सोहळा



असा पवित्र धार्मिक सोहळा होणार असून हिवरखेडातील सभा देखील या मंगल प्रसंगाशी संयोगाने होत आहे.





नागरिकांना आवाहन


ह्या ऐतिहासिक सभेला अकोट, तेल्हारा, हिवरखेड या तिन्ही नगरपरिषद क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून,

भाजपा उमेदवारांना विजयाच्या शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी मोठी गर्दी अपेक्षित आहे.


भव्य, दिव्य आणि ऐतिहासिक सभेचे साक्षीदार व्हा – असे आवाहन करण्यात आले आहे.




टिप्पण्या