akshay-nagalkar-murder-case: अक्षय नागलकर खून प्रकरणात मोठा उलगडा: ९ आरोपी अटक, हाडांचे तुकडे, दोन पिस्तुल व वाहने जप्त




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला | बहुचर्चित अक्षय नागलकर खून प्रकरणाचा मोठा उलगडा झाला असून, पोलिसांनी तब्बल ९ आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून मृतकाचे हाडांचे तुकडे, २ देशी पिस्तूल, मोटारी व मोटारसायकली अशा महत्त्वाच्या पुराव्यांचा ताबा घेण्यात आला आहे.





१५ मिनिटांमध्ये परत येतो म्हणत घराबाहेर… पण परतच आला नाही


अक्षय नागलकर (वय २६) हा २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी घराबाहेर पडला, मात्र परत आला नाही. कुटुंबीयांनी संशय व्यक्त करून डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची नोंद केली.


नातेवाईकांनी ही घटना घातपाताची असल्याचे नमूद केल्याने पोलिसांनी तपासाची गती वाढवली.





खुनामागील धक्कादायक कट उघड


तपासादरम्यान अक्षयला त्याचा मित्र आशु वानखडे याने मोटरसायकलवर घेऊन गेल्याची माहिती मिळाली. पुढे तपासात समोर आले की अक्षयचा पूर्वी वाद झाल्यामुळे चंदू बोरकर याने कट रचला होता.


त्यासाठी आरोपींनी गायगाव रोडवरील बंद हॉटेल भाड्याने घेतले. जेवणाच्या बहाण्याने अक्षयला बोलावून, हॉटेलचे शटर बंद करून त्याचा पिस्तुल व धारदार शस्त्राने खून करण्यात आला.


नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी शेतात टिनचा रूम बनवून मृतदेह जाळला आणि राख नदीत टाकली.





४८ तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई


पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विभाग, स्थानिक गुन्हे शाखा व डाबकी रोड पोलिसांच्या ८ पथकांनी धडक मोहीम राबवली.


४८ तासांत तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीद्वारे आरोपींचा मागोवा घेऊन अनुक्रमे अकोला, अहमदनगर, भुसावळ, बाळापूर व मध्य प्रदेश येथून आरोपींना पकडण्यात आले.





अटक आरोपी


१) चंदू बोरकर

२) आशु वानखडे

३) श्रीकृष्ण भाकरे

४) ब्रह्मा भाकरे

५) रोहित पराते

६) अमोल उन्हाळे

७) आकाश शिंदे

८) नारायण मेसरे

९) शिवा माळी





महत्त्वाचे जप्त साहित्य


मृतकाचे हाडांचे तुकडे


२ देशी पिस्तुल व ६ जिवंत काडतुसे


टाटा इंडिगो कार


३ मोटरसायकली


७ मोबाईल फोन






न्यायालयीन कारवाई


०१ नोव्हेंबर रोजी सर्व ९ आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.





पोलिसांची खात्री – “कठोर शिक्षा होणार”


घटनास्थळ व इलेक्ट्रॉनिक-फॉरेन्सिक तपासात मिळालेल्या पुराव्यांवरून आरोपींना कठोर शिक्षा निश्चित असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.



वादाचे मुळ कारण अन् पुरानी दुश्मनी


मयत अक्षय नागलकर याचा भाऊ शुभम विनायक नागलकर हा चंदु बोरकर याचे सोबत झालेल्या वादामुळे एम.पी.डी.ए. कायदयान्चये १ वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द झाला. यावरून अक्षय नागलकर याने चंदु बोरकर याला धमकावले होते. त्यामुळे चंदु बोरकर मागील काही महिन्यापासुन अक्षय नागलकर याचा खुन करण्याचा कट रचत होता. त्यासाठी त्याने या सर्व आरोपींना वेगवेगळ्या कारणाने विश्वासात घेत अक्षय नागलकर याचा खून करण्यासाठी तयार केले होते. खून करण्यासाठी ब्रम्हा भाकरे याचे मार्फतीने गायगाव रोडवरील बंद पडलेले हॉटेल चालविण्यासाठी घेतले होते. तसेच खुन केल्यानंतर प्रेत जाळुन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोरगाव भाकरे शेत शिवारातील ब्रम्हा भाकरे याचे शेतात टीन पत्राचे रूम बांधुन प्रत जाळण्यासाठी लागणारे लाकडे अगोदरच टिन पत्राचे रूमच्या मागे आणुन ठेवले होते. अक्षय नागलकर याला मारण्यासाठी हॉटेल MH 30मध्ये जेवणाच्या बहान्याने बोलावण्याची जबाबदारी आशु वानखडे याला देण्यात आले होते. आशु वानखडे याचे अक्षय सोबत जुने वाद असल्यामुळे तो यामध्ये सहभागी होण्यासाठी तयार झाला होता. अशी माहिती आरोपींच्या बयानातून समोर आली.



फरार शिवा माळी यास अटक

गुन्ह्यातील आठ आरोपींना पोलिसांनी याआधीच अटक केली होती. मात्र शिवा माळी (रा. बाकरबाद जि अकोला) हा घटनेच्या दिवसापासून फरार झाला होता. अखेर बैतूल, मध्य प्रदेश येथून शिवा उर्फ शिवहरी माळी यास अकोला पोलिसांनी काल अटक केली. त्यास इतर आरोपींसह आज न्यायालय समक्ष पेश करण्यात आले. 5 नोव्हेंबर पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.





टिप्पण्या