akola-municipal-corporation-el: मनपा आरक्षणास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – 2025 करीता राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार दि. 11 नोव्हेंबर रोजी प्रमिलाताई ओक सभागृहामध्ये अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्व साधारण प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्यात येऊन राज्य निवडणूक आयोगाचे मान्यतेकरिता सादर करण्यात आले होते.  


 

           

त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती (महिला) तसेच नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग बाबत आरक्षणाची सोडत मान्य करून नागरिकांचा मागासवर्ग  प्रवर्ग (महिला)  तसेच सर्व साधारण महिला आरक्षण पुन्हा सोडतीव्दारा दि. 17 नोव्हेंबर 2025 रोजी  निश्चित करून कार्यवाही करण्याबाबत निर्देशीत केले होते. त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाव्दारा अकोला महानगरपालिका, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह मध्ये आरक्षण सोडत घेऊन  नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्व साधारण (महिला) प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करून मा.राज्य निवडणूक आयोगाचे मान्यतेकरिता सादर केले असता, सदर आरक्षणास दि. 18 नोव्हेंबर 2025 रोजी मान्यता देण्यात येत असल्याबाबतचे अवर सचिव, राज्य निवडणूक आयोग यांचे स्वाक्षरीचे पत्र प्राप्त झाले आहे.


            

त्यानुसार आरक्षणावरील हरकती व सुचना मागविण्यात येऊन सदरचे आरक्षण अंतीम करण्याची कार्यवाही महानगरपालिका प्रशासनाने स्वत:चे स्तरावर पुर्ण करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्यास मा.राज्य निवडणूक आयोगाने कळविले असल्याने प्रारूप आरक्षण, हरकती व सूचना मागण्यासाठी दि. 19 ते 25 नोव्हेंबर 2025  या कालावधीत नागरिकांची निवडणूक विभाग कार्यालय, मनपा येथे सादर कराव्यात असे मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.              



                ....................

थकित करापोटी पश्चिम झोन येथील मालमत्‍तावर सीलची कारवाई.   


मनपा आयुक्‍त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्‍या  आदेशान्‍वये तसेच मनपा उपायुक्‍त विजय पारतवार आणि सहा.आयुक्त गजानन घोंगे यांच्‍या  मार्गदर्शनात अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पश्चिम झोन अंतर्गत वानखडे नगर, डाबकी रोड येथील वार्ड क्रं. बी -11  मालमत्‍ता क्रं. 549, अनिल हिवराळे यांचेकडे 2017-18 पासून आज पर्यंतचे एकुण रक्‍कम रूपये 2,07,012/- एवढा मालमत्‍ता कर थकित असल्‍याने त्यांच्या मलमत्तावर सील लावण्याची कारवाई करण्यात आली आहे.


            

सदर कारवाईत सहायक कर अधिक्षक राजेश जाधव, कर वसुली लिपिक अजय शिरसाट, इकबाल हुसैन, प्रकाश मालगे, मुदस्सीर अमीन, सै.अजहर आदींची उपस्थिती होती.


           

अकोला महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्‍ता धारकांनी आपला थकित व चालू वर्षातील मालमत्‍ता कराचा भरणा एकरकमी करून सील, जप्‍ती व लीलाव सारख्‍या अप्रीय कारवाई टाळावे असे आवाहन मनपा प्रशासनाव्‍दारे करण्‍यात आले आहे.

टिप्पण्या