akola-crime-news-dabki-road: अकोल्यातील घरफोडी प्रकरण: अवघ्या १२ तासात उकल; २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, चोरट्याने बाथरूमच्या खिडकीतून केला घरात प्रवेश!

डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या चमूची धडाकेबाज कारवाई; विधी संघर्षग्रस्त बालकाच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: डाबकी रोड परिसरातील मेहेरे नगर येथे घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा अकोला पोलिसांनी अवघ्या १२ तासांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १७३.३३० ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने आणि ₹५,३५० इतकी रोख रक्कम असा एकूण ₹२१,७५,१७५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले.


ही घटना १८ नोव्हेंबर २०२५ रोजी उघडकीस आली. फिर्यादी गौरव धर्मराज उर्फ बाळासाहेब विजयकर हे आपल्या कुटुंबासह मुलाच्या मंगळपुजेकरिता बाहेरगावी गेले होते. त्या वेळेचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या बाथरूमच्या खिडकीतून प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.


विजयकर यांनी डाबकी रोड पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक ३५३/२५  कलम ३०५(अ), १३१(३) BNS नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.


गुन्हा दाखल होताच, तपासाचे आदेश पोलीस निरिक्षक दीपक कोळी यांनी दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिषेक अंधारे यांनी डि.बी. पथकासह विविध दिशांनी तपास सुरू केला. चौकशीत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी विधी संघर्षग्रस्त बालक (रा. नेहरू नगर, खैर मोहम्मद प्लॉट, अकोला) यास ताब्यात घेतले.


चौकशीदरम्यान बालकाने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यातून गुन्ह्यात चोरलेले दागिने आणि रोख रक्कम असा ₹२१.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले.


पोलिसांच्या तत्पर व प्रभावी कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.





Key Points


घरफोडी प्रकरणाचा १२ तासांत पर्दाफाश


कुल मुद्देमाल जप्त – ₹२१,७५,१७५


सोन्या-चांदीचे एकूण वजन – १७३.३३० ग्रॅम


विधी संघर्षग्रस्त बालकाकडून गुन्ह्याची कबुली


डाबकी रोड पोलिसांची भक्कम तपास मोहीम






News Key words 


Akola Crime News 

Dabki Road Police 

Akola Police Action 

Burglary case

Theft Case 

Golden Jewellery Recovery Akola Breaking News Maharashtra Crime 

Fast Investigation 

Akola City Update




टिप्पण्या