- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
hindu-nav-varsh-swagat-yatra: अकोल्यात हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन; तर गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ‘पाडवा उत्सव’
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : शहरात सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने अकोला नगराचे आराध्य दैवत असलेले श्री राज राजेश्वर मंदिरातून चैत्र शुक्ल प्रतिपदा, शके १९४८ अर्थात गुढीपाडवा गुरुवार दिनांक १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ०७ वाजता हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याकरिता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक हॉटेल ग्रीड लँड येथे आयोजित पत्रकार परिषदेत संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रा.नितिन बाठे यांनी याबाबत माहिती दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या यावर्षी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी थोर महापुरुष, आद्य क्रांतिकारकांच्या वेशभूषेवर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच नव्या पिढीत राष्ट्रभावना दृढ करण्याच्या उद्देशाने लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू नववर्ष म्हणजे केवळ कालगणनेची सुरुवात नसून नवचैतन्य, नवसंस्कार आणि नवसंकल्प घेण्याची प्रेरणा आहे. या पार्श्वभूमीवर लेखन स्पर्धेत अकोला जिल्ह्याभरातून सर्व स्तरावर सहभाग नोंदविला जात आहे.
नववर्ष स्वागत यात्रेत अकोल्यातील सर्व राष्ट्र प्रेमी नागरिक बंधु भगिनींनी सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन सर्वश्री प्रा. नितीन बाठे, संयोजक समीर थोडगे, सहसंयोजक स्वानंद कोंडोलीकर, राम भिरड, स्वागत समिती अध्यक्ष ब्रिजमोहन चितलांगे, उपाध्यक्ष सर्वश्री डॉ. पार्थसारथी शुक्ल, रामप्रकाश मिश्रा, मंगेश वानखडे, हरिश अलिमचंदानी, अरविंद देठे, विनोद देव, अनिल गावंडे, निकेश गुप्ता, समर्थ शर्मा, पंकज सहगल, मनिष चंदनानी, स्वागत समिती महिला उपाध्यक्षा अर्चना शर्मा, पल्लवी रावणकर, डॉ. राधा पुरी, सोनल ठक्कर, रश्मी कायंदे, मीनाक्षी आपोतीकर, लता राठोड, महिला संयोजिका रेवती पांडे, सोनिया तऱ्हाळकर, मनीषा भुसारी, जयमाला खेडकर, विजया देशमुख, पुष्पा वानखडे, डॉ. स्नेहा गोखले, रुपाली धोत्रे, ऋतुजा पांडे, कोषाध्यक्ष शरद वाघ, प्रचार व प्रसार प्रमुख अभयसिंग राजपूत यांनी केले.
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा
राज राजेश्वर मंदिर, विठ्ठल मंदिर चौक, काळा मारोती, सिटी कोतवाली, गांधी चौक, तहसील ऑफिस, श्री राणी सती मंदिर, श्री गुरुद्वारा प्रबंधक समिति न्यू राधाकिसान प्लॉट मार्गे अशोक वाटिका येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मदनलाल धिंग्रा चौकातून टावर चौक, रतनलाल प्लॉट चौक, नेकलेस रोड मार्गे सिव्हिल लाइन चौकातून जवाहर नगर चौक, बारा ज्योतिर्लिंग मंदिर तेथून राऊत वाडी मार्गे जठारपेठ चौकातून संकल्प ढोल पथकाच्या सोबत सातव चौक मार्गे बिर्ला लेआऊट मधील जलाराम मंदिर येथून मार्गक्रमण करत समारोप बिर्ला राम मंदिर येथे संपन्न होणार आहे. तत्पूर्वी तेथे रामरक्षा पठण देखील होणार आहे. या यात्रेतील मार्गात येणार्याा सर्व मंदिरांना ध्वज प्रदान करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेला समितीचे सदस्य कार्यकारिणी सदस्य विनोद जकाते, प्रशांत पाटील, खेमराज भटकर, रूपेश वाखारकर, पंकज सादराणी, तुषार गोतमारे, जय राणे, मार्गदर्शक सदस्य नरेंद्र देशपांडे, गोपाल खंडेलवाल, डॉ. राजकुमार हेडा, ऍड मोतिसिंहजी मोहता, महेश जोशी, हेमेंद्र राजगुरू, चित्रा बापट, निलेश देव, आनंद बांगड, पुरुषोत्तम मालाणी, हे प्रामुख्याने उपस्थित होते.
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला पाडवा उत्सव
संस्कार भारती अकोला महानगर यांच्यावतीने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला 18 मार्च बुधवार रोजी संध्याकाळी सात वाजता "पाडवा उत्सव" हा नृत्य, नाट्य, संगीत, यांनी नटलेला "वंदेमातरम" या स्वातंत्र्याचे पुल्लिंग चेतवणाऱ्या गानाला दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. याचे अनुषंगाने सार्थ शती देव,देश, आणि धर्म या उदात्त संकल्पनेवर आधारित सांगितिक सादरीकरण जवाहर नगर स्थित छत्रपती संभाजी राजे पार्क येथे संपन्न होत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत संस्कार भारतीचे प्रा.निनाद कुळकर्णी यांनी दिली.
akola culture
akola news
gudhi padawa
hindu navvarsh
indian festival
new year
padawa utsav
swagat yatra
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा