property-seal-action-tax-akola: थकित करदारांवर मनपाची कडक कारवाई : पूर्व झोनमधील 3 मालमत्तांवर सील, शास्ती अभय योजनेचा शेवटचा टप्पा
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे शिंगणे
अकोला : अकोला महानगरपालिकेने थकित मालमत्ता कर न भरलेल्या तीन मालमत्तांवर सील लावण्याची कारवाई केली आहे. ही कारवाई मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. सुनिल लहाने यांच्या आदेशानुसार तसेच उपायुक्त विजय पारतवार आणि सहायक आयुक्त राजेश सरप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सिव्हिल लाईन, वार्ड क्र. अ-1 येथील धा. राजुरकर यांच्या तीन मालमत्तांवर कारवाई झाली —
मराठा इंटरनेट कॅफे (मालमत्ता क्र. 255) : थकबाकी ₹33,129/- (2020-21 पासून)
शुक्ला इंटरनेट (मालमत्ता क्र. 256) : थकबाकी ₹48,553/- (2018-19 पासून)
दांदळे क्लिनिक (मालमत्ता क्र. 258) : थकबाकी ₹76,263/- (2016-17 पासून)
मनपाने या सर्व मालमत्तांवर सील लावून जप्तीची कार्यवाही केली आहे.
या मोहिमेत राजेश सोनाग्रे, रमाकांत बगरेट, दीपराज महल्ले, संतोष पांडे, सुधीर मिसूरकर, गणेश पद्मने, संगीता शिंदे आदी सहभागी झाले.
शास्ती अभय योजनेचा शेवटचा टप्पा – फक्त दोन दिवस बाकी!
अकोला मनपाकडून 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सुरू असलेल्या शास्ती अभय (व्याज माफी) योजने अंतर्गत, थकित कर एकरकमी भरल्यास 75% शास्ती माफ केली जात आहे.
शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2025
मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांचे आवाहन
“थकित कर एकरकमी भरा, आणि सील, जप्ती व लिलाव सारख्या कारवायांपासून वाचवा.”
मनपा उपायुक्त विजय पारतवार म्हणाले
“थकित आणि चालू वर्षाचा कर वेळेवर भरून शहराच्या विकासात योगदान द्या.”
Image Caption
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा