prakash-ambedkar-oladushkal: प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर गंभीर आरोप : “महाराष्ट्र शासन हे चोरांचे शासन, ओला दुष्काळ जाहीर का होत नाही?”

Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi, Akola, Press Conference 



ठळक मुद्दा

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र सरकारवर तीव्र हल्ला चढवत “हे चोरांचे शासन आहे” असा आरोप केला. ओला दुष्काळ जाहीर न करण्यामागे सरकारचा भ्रष्टाचार दडलेला असल्याचे ते म्हणाले.



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. ओल्या दुष्काळाची घोषणा अद्याप न केल्याबद्दल त्यांनी सरकारला थेट जबाबदार धरत, “हे सरकार चोरांचे शासन आहे” अशी घणाघाती टीका केली.


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यभरात यंदाच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून पीक उत्पादनावर गंभीर परिणाम होणार आहे. तरीदेखील शासनाने अद्याप ओला दुष्काळ घोषित केलेला नाही. “जर सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला तर खावटी जाहीर करावी लागते, पण टेंडरमधून होणारा पैशांचा गैरव्यवहार थांबेल म्हणूनच सरकार ओला दुष्काळ घोषित करत नाही”, असा आरोप त्यांनी यावेळी केला.


सरकार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन देत आहे, मात्र कायदेशीरदृष्ट्या नुकसानभरपाई फक्त ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतरच देता येते, असेही आंबेडकरांनी स्पष्ट केले.


कर्जमाफीच्या मुद्द्यावरही त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. “जर कर्जमाफी केली तर बँकेचे कर्ज सरकारला फेडावे लागते, त्यामुळे मलिदा कमी होतो. म्हणूनच शेतकऱ्यांचे ७/१२ अद्याप कोरे केलेले नाहीत”, अशी टीका त्यांनी केली.


प्रकाश आंबेडकरांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनाही लक्ष्य केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ राजकारण केले जात असून खरी मदत मात्र पोहोचत नाही, असा आरोप त्यांनी केला.


पुन्हा एकदा सरकारवर ताण!


राज्यात ओल्या दुष्काळाच्या घोषणेचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. पिकांचे नुकसान वाढत असताना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडून ठोस निर्णयाची अपेक्षा आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या आरोपानंतर पुन्हा एकदा सरकारवर ताण निर्माण झाला आहे.


     ………………………


प्रकाश आंबेडकर बातमी


ओला दुष्काळ महाराष्ट्र


महाराष्ट्र सरकारवर आरोप


वंचित बहुजन आघाडी


शेतकरी कर्जमाफी


महाराष्ट्र शासन चोर सरकार


   …………………………..


टिप्पण्या