political-bharat-bjp-VBA-akola: देश महत्वाचा आहे की नाही ? हे ठरवा आणि मोदींना टाटा, बाय बाय करून देशाला वाचवा- प्रकाश आंबेडकर यांचा धम्म मेळाव्यात घणाघात



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: भारतीय सैन्य लढायला तयार आहे. पण, लढणार कुठून? पाकिस्तानला येणारी युद्ध सामग्री ही जगभरातील देशांकडून येत आहे. पाकिस्तानकडे बाहेरची हत्यारे येत आहे. ही परिस्थिती बदलायची असेल, तर मोदींना टाटा, बाय बाय करा. त्याचं आणि जगाच भांडण आहे ते भारतीयाचे नाही, असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केला.



अकोला येथील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर धम्म प्रवर्तन दिनानिमित्त  आयोजित भव्य धम्म मेळावा मध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी आरएसएस आणि भाजपावर कडाडून टीका केली तसेच ओबीसी आरक्षणावर ओबीसी आरक्षण संदर्भात त्यांनी सल्ले दिलेत.  


जगातले देश जर पाकिस्तानला मदत करत असतील, तर काय राहणार आहे ? आज एकही मित्र भारताचा राहिलेला नाही. पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील देश पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिले, असे सांगून मोदी त्यांचा इगो जपण्यासाठी काम करत आहे. 


देश महत्वाचा आहे की नाही ? हे ठरवा आणि मोदींना टाटा, बाय बाय करून देशाला वाचवा, असे बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हंटले. हाच मुद्दा पुढे रेटत, आंबेडकर यांनी, तुम्हाला मतदान दिले म्हणजे तुम्ही आमचे मालक झाले नाहीत. जर मालक बनण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आपटल्या शिवाय राहणार नाहीत, हे लक्षात ठेवा, असा गंभीर इशारा केला.




स्वतःला विश्वगुरु म्हणणारे देशाच्या संकटात भर घालताय. जगभरात भारतीयांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. जगभरातील 20 कोटी भारतीय देशात परत आले तर इथल्या व्यवस्थेवर ताण पडेल. स्वतःला विश्वगुरु म्हणणारे नरेंद्र मोदी यांना परदेशात जगातील देश कशा पद्धतीने वागणूक देताय त्याचे हजारो व्हिडीओ युट्युबवर आहेत.इतका अपमान नरेंद्र मोदीचा जगभरातील देश करतात, असे बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले.


ओबीसींनी वेळीच सावध व्हावे

ओबीसींचा घात आरएसएस-भाजपने केला. एवढं तरी ओबीसींनी डोक्यात घ्यावे, तरच ओबीसी आरक्षण वाचेल.

स्थानिक पातळीवर जे आरक्षण निघत होते, त्यात ओबीसी नेतृत्व पुढे येत होते. आता ते सुद्धा हातातून जाण्याची शक्यता आहे. नुसते राजकीय आरक्षण जाणार नाही, तर शैक्षणिक आरक्षण सुद्धा जाईल.त्यामुळे ओबीसींनी वेळीच सावध व्हावे, असा सल्ला बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला.


मोहन भागवत कधी शेगावच्या गजानन महाराज मंदिरात गेले का? 

मोहन भागवत कधी शेगावच्या गजानन महाराज मंदिरात गेले का? मोहन भागवत महिन्यातून 2 दिवस अकोला शहरात असतात. ते कधीच शेगावला का गेले नाहीत ? कदाचित आता मी बोलल्यानंतर जातील ही. यातून ओबीसींनी धडा घ्यायचा आहे की, हे तुमचा फक्त वापर करताय. सत्तेच्या चाव्या प्रस्थापित निजामी मराठ्यांच्या हातात आहेत, असे देखील बाळासाहेब आंबेडकर म्हणाले.


ओबीसींना स्वतःची लढाई स्वता लढावी लागेल.

ओबीसींना स्वतःची लढाई स्वता लढावी लागेल. जे भाजपावर आता विश्वास ठेवातय, ते इथल्या व्यवस्थेशी लढू शकतात का ?  तो मोदी, शाह, फडणवीसला शिव्या देईल का? तो नाही देणार कारण, यांचे घोंगडे आरएसएस-भाजपच्या  हातात अडकले आहे म्हणून ते भाजपशी लढू शकत नाही, असे  बाळासाहेब आंबेडकर म्हणाले.



आरएसएस - भाजपच्या सत्तेत ‘मदत’ हा शब्दच नाही. 

आरएसएस - भाजपच्या सत्तेत ‘मदत’ हा शब्दच नाही. ज्या ज्या शेतकऱ्यांनी भाजपला मत दिले होते, त्या सर्व पूरग्रस्त शेतकऱ्यांनी धडा घ्यावा.


भाजप म्हणतंय की, दिवाळी मध्ये शेतकऱ्यांना मदत करू. पण, मला खात्री आहे की, भाजप ही मदत करणार नाही कारण, आरएसएस भाजपचा मदतीचा पायंडा नाहीये. मदत कशासाठी पाहिजे? हा भाजपचा होरा आहे. ज्यांनी भाजपला मतदान दिले त्यांना माझा सवाल आहे की, ह्या भाजपला तुम्ही सत्तेवरून खाली खेचणार का? हा मोठा प्रश्न असल्याचे बाळासाहेब आंबेडकर म्हणाले.

टिप्पण्या