- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
obc-reservation-channi-police: छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक विजय बोचरे यांनी घेतला टोकाचा निर्णय; ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये; व्हॉट्सॲप स्टेटस ठेवून व्यक्त केली शेवटची इच्छा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Akola news Patur channi police station
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: “ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये”, “जातीय जनगणना झाली पाहिजे”, “आमचं जीवन जगण्याचा अर्थ नाही” व्हॉट्स ॲप स्टेट्स ठेवून अकोला जिह्यातील आलेगाव येथील ५९ वर्षीय शेतकरी विजय बोचरे यांनी जीवन यात्रा संपविली. त्यांनी आलेगाव बसस्थानकावरील प्रवासी निवाऱ्यात जीवन संपवलं. या घटनेने संपूर्ण परिसराला हादरवून सोडलं आहे.
ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेले आणि मंत्री छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे बोचरे यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे ओबीसी समाजात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. तत्पूर्वी, बोचरे यांनी आपल्या मोबाईलवर सलग तीन भावनिक स्टेटस पोस्ट केले होते. त्यांनी लिहिलं होतं —
१) राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आमच्या मुला–बाळांचं भविष्य धोक्यात आलं आहे.
२) शिक्षणात, नोकरीत आणि राजकारणात आमचं स्थान हरवत चाललं आहे. आमचं जीवन जगण्याचा अर्थ नाही.
३) जातीय जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये.
हे संदेश त्यांनी पहाटे साडेदोनच्या सुमारास स्टेटसवर ठेवले, आणि त्यानंतर काही वेळातच मृत्युला जवळ केलं.
चान्नी पोलीस तत्काळ घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने आलेगाव बसस्थानकावर दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे. विजय बोचरे यांच्या मृत्यूने आलेगाव व पातूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. बोचरे हे मेहनती शेतकरी आणि ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी नेहमी लढा देणारे कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाने गावातील वातावरणच शोकाकुल झालं आहे.
ओबीसी आरक्षण
Akola news
channi police
Chhagan Bhujbal
OBC reservation
staunch supporter
Vijay Bochare
WhatsApp status
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा