- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आपटा आणि शमीच्या झाडांची विधीवत पूजा
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : दसरा सण हा परंपरेने सोनं-चांदी वाटपाचा आणि सत्याच्या विजयाचा दिवस मानला जातो. या दिवशी आपट्याची आणि शमीची पाने सोनं-चांदीप्रमाणे वाटली जातात. अकोल्यातील म्हैसपूर येथील गोरक्षण संस्थेत असलेल्या या दोन्ही झाडांना विशेष महत्त्व आहे.
दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शेकडो भाविक येथे येऊन आपटा आणि शमीच्या झाडांची विधीवत पूजा करतात. या झाडांना ‘सोन्याचं आणि चांदीचं झाड’ असेही संबोधले जाते.
पूजा संपल्यानंतर सीमा उल्लंघन करण्याची पारंपरिक प्रथा पाळली जाते. भाविक यावेळी वडील मंडळींचा आशीर्वाद घेतात आणि एकमेकांना आपट्याची व शमीची पाने देऊन ‘सोनं’ वाटल्याचा शुभसंकेत मानला जातो.
या सोहळ्याने अकोल्यातल्या दसरा उत्सवाला धार्मिक आणि सामाजिक रंग प्राप्त होतो.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा